मुंबई, 28 नोव्हेंबर : महामार्गांवर भीषण अपघात होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कल्याणी कुरळे हिचा डंपरच्या धडकेत अपघाती निधन झालं. कल्याणी नंतर आणखी एका कलाकावंतानं अशा अपघातात आपला जीव गमावला आहे. पंढरपूर जवळ ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पंढरपूर जवळच एका फॉर्च्युनर कार 5 फूट खोल कालव्यात पडल्यानं मीना देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकून तीन जण जखमी झालेत तर मीना देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. मीना देशमुख यांच्या जाण्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख रविवारी रात्री आपल्या फॉर्च्युनर कारनं मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत होत्या. गाडीत मीना देशमुख यांच्यासह त्यांची मुलगी, नात आणि ड्रायव्हर होते. रात्रीच्या वेळी अरुंद पुलावरून गाडी जात असताना ड्रायव्हरचं गाडीवरंच नियंत्रण सुटल्यानं गाडी 50 फूट खोल कालव्यात पडली. कालवा इतका खोल होता की त्यात उतवण्यासाठी पूरेशी जागा नव्हती. तसंच रात्रीच्या वेळी अपघात झाल्यानं माहिती उशिरा मिळाली. अपघाताची माहिती मिळताच बाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरूवात केली. अँम्ब्युलन्स बोलावून गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवलं. मात्र मीना देशमुख यांचा जागीत मृत्यू झाला होता.
हेही वाचा - Vikram Gokhale : विक्रम गोखले कुटुंबासाठी किती कोटींची संपत्ती सोडून गेले?
गाडी ज्या कालव्यात पडली त्या कालव्यात उतरण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे मदत कार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे जखमींना उपचार देण्यास उशिर झाला. गावातील लोकांनी जखमींना दोराच्या सहाय्यानं बाहेर काढलं. पण मीना देशमुख यांनी गाडीतच प्राण सोडले होते.
ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी म्हणजे पंढरपूर कुर्डुवाडी येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. तसंच तिथले पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पुलाचा प्रश्न अजूनही पूर्ण झाला नाहीये. त्यामुळे हा पूल दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याचं मनसे जिल्हा प्रमुखांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.