ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन

त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू होते.

  • Share this:

मुंबई, 30 आॅक्टोबर : ज्येष्ठ संगीतकार, गीतकार  यशवंत देव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. मुंबईतील  शुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला.  त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू होते. यशवंत देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यातही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले होते.

आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. त्या नंतरच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला होता.

- यशवंत देव यांचा अल्पपरिचय

- जन्म - १ नोव्हेंबर १९२६ साली  

- घरात वडिलांच्या रुपाने मिळाले पहिले गुरू

- आकाशवाणीवर सतारवादक म्हणून कारकीर्दीला सुरुवात

- जी. एन. जोशी आणि गजानन वाटवे यांच्यामुळे शब्दप्रधान गायकीकडे वळले

- मुंबई आकाशवाणीवरील 'भावसरगम' कार्यक्रम चांगलाच गाजला

- आचार्य रजनीश यांचा भावानुवादही रसिकांना आवडला

- अनेक हिंदी, मराठी सिनेमे आणि नाटकांना संगीत दिलं

- ग. दि. माडगुळकरांच्या 'कथा ही रामजानकीची' या नृत्यनाटिकेला संगीत दिलं

- लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार, शरद क्रीडा सांस्कृतिक पुरस्काराने सन्मान

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गाणी

- अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

- तुझे गीत गाण्यासाठी

- अशी पाखरे येती आणिक

- असेन मी नसेन मी

- काही बोलायचे आहे पण बोलणार नाही

- उघडी नयन शंकरा

- कुठे शोधिसी रामेश्वर

=============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 08:08 AM IST

ताज्या बातम्या