RIP Rishi Kapoor : 3 महिन्यांपूर्वी शेअर केला होता लतादीदींबरोबरचा हा UNSEEN फोटो

RIP Rishi Kapoor : 3 महिन्यांपूर्वी शेअर केला होता लतादीदींबरोबरचा हा UNSEEN फोटो

ऋषी कपूर यांनी अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच त्यांनी लतादीदींसोबतचा एक खास फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याची गोड आठवणही सांगितली होती.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचा अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासही पूर्ण होत नाही अशात जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं. त्यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. ऋषी कपूर सोशल मीडियावर बरेच सक्रिय होते. कॅन्सरवर उपचार घेत असतानाही ते ट्विटरच्या माध्यामातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसले होते. दरम्यान अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच त्यांनी लतादीदींसोबतचा एक खास फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याची गोड आठवणही सांगितली होती.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये लता दीदींच्या हातात एक बाळ दिसत आहे. हा फोटो शेअर करताना ऋषी कपूर खूप भावूक झाले होते. या फोटोमध्ये दिसणारं हे बाळ दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द ऋषी कपूरच आहेत. हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा ऋषी कपूर अवघ्या 3 महिन्यांचे होते. त्यांची ही ट्विटर पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती.

लता दीदींसोबतचा हा फोटो शेअर करताना ऋषी कपूर यांनी लिहिलं, नमस्कार लता जी. तुमच्या आशीर्वादानं मला, आपला मी 3 महिन्याचा असतानाचा फोटो सापडला. तुमचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच राहिला आहे. धन्यवाद. मी हा फोटो ट्विटरवर शेअर करुन सर्वांना सांगू इच्छितो की हा फोटो माझ्यासाठी किती मौल्यवान आहे.

नुकतीच ऋषी कपूर यांनी घोषणा केली होती की ते लवकरच दीपिका पदुकोणसोबत द इंटर्न या सिनेमात दिसणार आहेत. पण आता त्यांच्या अचानक जाण्यानं दीपिकाला सुद्धा धक्का बसला. मुलगा रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड असूनही ऋषी कपूर आणि दीपिकाचं एक खास नातं होतं. ते कॅन्सरवर उपचार घेत असताना दीपिका त्यांना भेटायला न्यूयॉर्कला गेली होती.  दीपिकाचा हा  सिनेमा हॉलिवूड सिनेमा 'द इंटर्न'चा हिंदी रिमेक असणार आहे. या सिनेमाची निर्मिती दीपिका पदुकोण करत आहे.

First published: April 30, 2020, 10:23 AM IST

ताज्या बातम्या