मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'जगात माझं कुणीच नाही, मला मारून टाका'; उपचारासाठीही पैसे नसलेल्या आजारी ज्येष्ठ अभिनेत्रीने मागितला मृत्यू

'जगात माझं कुणीच नाही, मला मारून टाका'; उपचारासाठीही पैसे नसलेल्या आजारी ज्येष्ठ अभिनेत्रीने मागितला मृत्यू

सविता या त्यांच्या उतारवयात आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. तर उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की मला मृत्यु आला तरी चालेल.

  • Published by:  News Digital
मुंबई 15 जुलै : ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज (Savita Bajaj) सध्या तिच्या आजारपणामुळे फारच चर्चेत आहे. सविता या त्यांच्या उतारवयात आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. तर उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की मला मृत्यु आला तरी चालेल. सविता यांना मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. पण त्यांच्याजवळ कोणीच नाही तर त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. त्यांनी म्हटलं, “माझी स्थिती फार खराब आहे. माझ्याकडे कोणीही नाही. मी खूप पैसे कमावले होते पण सगळे उपचारांसाठी खर्च झाले. बँकेत केवळ 35 हजार रुपये होते ते देखील काढले आहेत.” आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे म्हटलं की, “गळा दाबून मला मारून टाका , मला असं जीवन नाही जगायचं. यापेक्षा तर मी मेलेली बरी. या जगात माझं कोणी नाही, जो माझी काळजी घेईन.”

'गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली' असा रंगला राहुल- दिशाचा हळदी समारंभ

अभिनेत्री सविता बजाज आधी कोरोना आणि मग आजारपणामुळे आर्थिक विवंचनेतून जात आहे. त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नाहीत. गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावत आहे. अँम्ब्युलन्सच्या स्ट्रेचरवर झोपलेल्या सविता यांनी हॉस्पिटल स्टाफकडेच मृत्यु मागीतला आहे.

10 वर्षांच्या स्ट्रगलनंतर कार्तिक आहे कोट्यवधींचा मालक; मुंबईत स्वतःचं घर आणि खास गाड्यांचं कलेक्शन

'निशांत', 'नजराना' आणि 'बेटा हो तो ऐसा' या चित्रपटांत तर  'नुक्कड़', 'मायका' आणि 'कवच' या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तर त्यांनी आपलं या जगात कोणीही नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राइटर्स असोसिएशन आणि CINTAA (सिने अँड टेलीविजन आर्टिस्ट असोसिएशन) कडून क्रमशः 2 हजार आणि 5 हजार रुपये मदत मिळते. त्यातूनच त्यांचा खर्च चालतो असही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी असही म्हटलं की 25 वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या घरी जाण्याचा विचार केला पण कोणीही त्यांना घरी घ्यायला तयार नाही. पुढे म्हणाल्या की, “मी खूप पैसे कमावले, अनेकांची मदत केली पण आज माझ्यासोबत कणीच नाही.”
First published:

Tags: Bollywood actress, Entertainment

पुढील बातम्या