मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

250हून अधिक सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीकडे उपचारांसाठी नाहीत पैसे; सरकारी रुग्णालयात आहे अँडमिट

250हून अधिक सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीकडे उपचारांसाठी नाहीत पैसे; सरकारी रुग्णालयात आहे अँडमिट

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीवर आज स्वत:च्या उपचारांसाठी दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या मदतीला आरोग्यमंत्री धावून आलेत.

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीवर आज स्वत:च्या उपचारांसाठी दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या मदतीला आरोग्यमंत्री धावून आलेत.

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीवर आज स्वत:च्या उपचारांसाठी दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या मदतीला आरोग्यमंत्री धावून आलेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  19 सप्टेंबर : असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी सिनेसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. मात्र त्यांच्या वाईट काळात त्यांना कोणाचीच साथ मिळेनाशी झाली आहे. साउथ फिल्म इंडस्ट्रीच्या ज्येष्ठ अभिनेत्री जयाकुमारी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री जयाकुमारी किडनीच्या आजारानं ग्रस्त असून त्यांच्यावर चेन्नईच्या एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या 72 वर्षांच्या आहेत. जयाकुमारी यांच्याकडे स्वत:च्या आजावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नाहीत अशी माहिती समोर येत आहे. आर्थिक मदतीसाठी त्यांना दुसऱ्यांकडे हात पसरावे लागत आहेत.

1960 ते 1970 च्या दशकातील तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीतील जयाकुमारी या आघाडीच्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. लाखो प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. मात्र आज त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या असून त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नाहीत. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात त्या रुग्णालयातील बेडवर बसलेल्या दिसत आहेत. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, जयाकुमारी यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधनझालं. त्या मुलगा रोशन यांच्याबरोबर राहतात. असं म्हटलं जात आहे की त्यांनी तमिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे.

हेही वाचा - Brahmastra Box office Collection : ब्रह्मास्त्रने तोडले 'द काश्मीर फाइल्स'चे रेकॉर्ड; काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

जयाकुमारी यांचे पती नागपट्टिनम अब्दुल्लाह यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. दोघांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. पण तिघांपैकी एकाही मुलानं त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली नाही असं म्हटलं जात आहे.  जयाकुमारी यांच्या उपचारांसाठी लोखो रुपयांचा खर्च येणार आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संटकालाही समोरं जावं लागणार आहे. त्यामुळेचं त्या लोकांकडे मदतीची अपेक्षा करत आहेत. सिनेसृष्टीतील लोकांना त्यांना आर्थिक मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे.

आरोग्य मंत्र्यांनी केली मदत  

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यम यांना जयाकुमारी यांच्या आजाराबाबत कळताच त्यांनी त्यांची भेट घेतली.  जयाकुमारी यांच्या आजारपणात रुग्णालयात होणाऱ्या खर्चाकडे ते लक्ष देतील असं आश्वासन त्यांना दिलं आहे.

अभिनेत्री जया कुमारी यांनी आजवर 300हून अधिक सिनेमांमध्ये कामं केली आहेत. एनगिरिन्डो, वंडल, हरमना, नुतरुक्कू नुरू, अनाथै, आनंदन संग सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

First published:

Tags: South actress, South film, South indian actor