मुंबई, 15 मार्च- मनोरंजन सृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचं निधन झालं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'नुक्कड'मधून खोपडी या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. परंतु त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
समीर खक्कर यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु आजही त्यांना त्यांच्या 'खोपडी' या भूमिकेमुळेच ओळखले जाते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या 71 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
समीर खक्कर हे गेल्या 37 ते 38 वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांना पसंत पडत होत्या. काही दिवसांपूर्वीच अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांनतर आता समीर खक्कर यांच्या निधनाचे वृत्त समोर आलं आहे. या कलाकारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, समीर खक्कर यांच्यावर मुंबईतील, बोरिवली स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार केलं जाणार आहेत. ते सध्या 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर मनोरंजन सृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोशल मीडियावरुन लोक त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समीर खक्कर यांनी मध्यंतरी काही काळ पडद्यावरुन विश्रांती घेतली होती. याकाळात ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांनतर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भारतात येत पुन्हा कामाला सुरुवात केली होती. समीर खक्कर यांनी बॉलिवूड चित्रपट हिंदी-गुजराती मालिकांमध्येही काम करत आपला ठसा उमठवा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actor