रणबीरच्या आईचा TikTok डेब्यू, 'COOL आजी'चा नातीबरोबरचा VIDEO VIRAL

रणबीरच्या आईचा TikTok डेब्यू, 'COOL आजी'चा नातीबरोबरचा VIDEO VIRAL

ज्येष्ठ अभिनेत्री नितू सिंह कपूर यांनी देखील इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मात्र त्यांना ‘ज्येष्ठ’ म्हणावं की नाही असा प्रश्न पडतो आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : इन्स्टाग्राम-फेसबुकपाठोपाठ आता अनेक कलाकार टिकटॉक अपवर प्रसिद्ध होण्यासाठी धडपड करत असतात. ‘टिकटॉक स्टार’ असा एक वेगळा वर्ग आपल्या देशात तयार झाला आहे. मग मोठमोठ्या कलाकारांना टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरत नाही आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नितू सिंह कपूर यांनी देखील इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मात्र त्यांना ‘ज्येष्ठ’ म्हणावं की नाही असा प्रश्न पडतो आहे. नातीसोबत त्यांनी हा टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे. नात समाराच्या डान्स स्टेप फॉलो करत नितू कपूर यांनी तरुणाईला लाजवेल असा टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे.

‘सॅमने अशाप्रकारे Tiktok Thingy करण्यासाठी आग्रह केला, यामध्ये मला काहीही कल्पना नाही आहे आणि फक्त तिला फॉलो केलं आहे. कधीकधी तुमच्या प्रियजनांना आनंद देण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात’, अशी कॅप्शन देत नितू कपूर यांनी या भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

Sam insisted to do some tik tok thingy ‍♀️ had no clue just followed to please her ‍♀️ sometimes you gotta do things to make your loved ones happy #samstories #totalconfusion

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

यावेळी त्यांनी #totalconfusion असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. व्हिडीओ बनवताना नितू सिंह जरी गोंधळलेल्या असल्या तरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप हिट ठरला आहे. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या वयातही इतक्या लयीत डान्स मुव्ह्स केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये कुणी त्यांना coolest mom म्हटलं आहे तर कुणी coolest nani. ‘तुमच्या फिटनेसचा मंत्र जाणून घ्यायचा आहे’ अशी कमेंट देखील एका युजरने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 06:47 PM IST

ताज्या बातम्या