मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Achyut Potdar: 'माझा होशील ना' मधील आप्पांची नव्या मालिकेत ग्रँड एंट्री; 87 व्या वर्षीही मालिकेत अभिनय

Achyut Potdar: 'माझा होशील ना' मधील आप्पांची नव्या मालिकेत ग्रँड एंट्री; 87 व्या वर्षीही मालिकेत अभिनय

माझा होशील ना मालिकेतल सई आदित्यबरोबरचं आदित्यचे आजोबा म्हणजेच आप्पाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. हेच आप्पा आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 16 ऑगस्ट:  आदित्य आणि सईची भन्नाट लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. माझा होशील ना मालिकेतील सगळीच पात्र अप्रतिम होती. तीन पिढ्यांचा प्रवास आणि त्याच आलेल्या सईची गोष्ट प्रेक्षकांना भावली. मालिकेतील आप्पा देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आप्पा आणि सईची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांनी आप्पांची भूमिका साकारली होती.  हेच आप्पा आता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेते अच्युत पोतदार हे सोनी मराठीवरील जिवाची होतीया काहिली या मालिकेत दिसणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अच्युत यांनी ग्रँड एंट्री मालिकेत करण्यात आली आहे. सोनी मराठी वाहिनी मागच्या काही महिन्यांपासून एकाहून एक उत्तम मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी यानिमित्तानं छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  मालिकेच्या 15 ऑगस्टच्या विशेष भागात त्यांची एंट्री झाली आहे. स्पेशल एपिसोडमध्ये आपण पाहिलं तर गावातील झेंडावंदनासाठी आप्पा म्हणजेच विद्याधर जोशी आणि तात्या म्हणजेच अतुल काळे यांच्या चुरस रंगलेली असती. दरम्यान यांच्या भांडणात भास्कर आनंद म्हणजेच अभिनेते अच्युत पोतदार यांची एंट्री होते.  जिवाची होतीया काहिली मालिकेत अच्युत पोतदार हे गावचे पुढारी आहेत. केवळ पुढारीच नाही ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हेही वाचा - Bhagya Dile Tu Mala : सानिया करणार का कावेरीला रत्नमालापासून दूर? एपिसोड अपडेट आला समोर
 Achyut Potdar
अच्युत पोतदार यांची मालिकेत एंट्री झाल्यामुळे मालिकेत आता कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. अभिनेते अच्युत पोतदार यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते आज वयाच्या 87व्या वर्षीही मालिकेचं शुटींग करत आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी माझा होशील ना मालिकेचं घरुन शुटींग केलं होतं. त्यांची कामाप्रती असलेली आवड पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. अच्युत पोतदार यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत आजवर अनेक हिंदी मराठी सिनेमात काम केलं आहे. आजवर त्यांनी  125 बॉलिवूड सिनेमे केले आहेत. 26हून अधिक नाटके आणि 45 हून अधिक जाहिरातींमध्ये कामं केली आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या