अभिनेत्री प्रीतिका चौहानला ड्रग्ज प्रकरणी अटक, पेडलरला भेटायला गेली असता पोलिसांची छापेमारी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनचा तपास एनसीबीकडून केला जातच आहे. पण आता आणखी एक ड्रग केस एनसीबीसमोर आली आहे.
आशिष सिंह, मुंबई, 25 ऑक्टोबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनचा तपास एनसीबीकडून केला जातच आहे. पण आता आणखी एक ड्रग केस एनसीबीसमोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने यामध्ये काही महत्त्वाच्या अटक देखील केल्या आहेत. 25 ऑक्टोबरला मुंबईत एका अभिनेत्रीला ड्रग घेताना एनसीबीने रंगेहात पकडलं आहे. प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करते. वर्सोवामध्ये एका ड्रग पेडलरला भेटायला गेली असता एनसीबीने ही धडक कारवाई केली आहे.
एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने अभिनेत्रीबरोबरच पेडलर फैजलला देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान दीपक राठोड हे नाव समोर आले आहे. या व्यक्तीचा तपास एनसीबीकडून सुरू आहे.
A team of Mumbai Zonal Unit apprehended two persons at Machhimar, Versova, and succeeded in a seizure of 99 grams of Ganja from their possession, yesterday. The two persons - one Faisal & TV actor Preetika Chauhan - were arrested & produced before court: Narcotics Control Bureau
या अटकसत्राबाबत माहिती देताना एनसीबीने असे म्हटले आहे की, दोघांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टासमोर हजर केले होते. दरम्यान फैजल आणि प्रीतिका यांना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गांजाच्या सप्लाय होत असल्याची टीप मिळाल्यानंतर वर्सोव्यातील मच्छिमार भागात एनसीबने ही कारवाई केली आहे.
फैजल हा टॅक्सी ड्रायव्हर असून प्रीतिका टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिने सीआयडी आणि संटमोचन महाबली हनुमान यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनचा एनसीबीकडून तपास सुरू आहे. हा तपास सुरू असतानाच एनसीबीसमोर हे नवे प्रकरण समोर आले आहे. SSR मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली होती. अभिनेत्री दीपिका पादूकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान या अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) तब्बल एक महिना जेलमध्ये काढावा लागला होता.
दुसरीकडे सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी तपास यंत्रणा सीबीआयने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की त्यांनी या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही. याप्रकरणी मीडिया ट्रायलसंदर्भात जनहित याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने टीका केली की होती की, माध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे आणि ते नियंत्रित करण्याचा प्रश्न नसून काम संतुलित करण्याचा आहे.
त्याचप्रमाणे सँडलवूडमध्ये देखील काही दिग्गज कलाकारांना अटक करण्यात आली आहे. आता मुंबईतील टेलिव्हिजन विश्वात देखील आजची अटक झाल्याने ड्रग्जची पाळमुळं कुठवर पोहोचली आहेत, हे समोर येणं महत्त्वाचं ठरेल.