मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'वीरे दी वेडिंग'च्या सिक्वेलची दणक्यात तयारी सुरू; सिनेमात झळकणार या अभिनेत्री

'वीरे दी वेडिंग'च्या सिक्वेलची दणक्यात तयारी सुरू; सिनेमात झळकणार या अभिनेत्री

वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding)सिनेमाचा सिक्वेलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लवकरच सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे.

वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding)सिनेमाचा सिक्वेलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लवकरच सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे.

वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding)सिनेमाचा सिक्वेलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लवकरच सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे.

  मुंबई, 25 ऑक्टोबर: वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. सिनेमातले डायलॉग्ज, कलाकारांचा अभिनय आणि उत्तम लेखन यामुळे प्रेक्षकांनी 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. या सिनेमाचा सिक्वेल येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात जे मुख्य कलाकार होते तेच सिनेमाच्या दुसऱ्या भागातही झळकणार आहेत. वीरे दी वेडिंगच्या सिक्वेलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सोनम कपूर, करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या अभिनेत्रींचा धुमाकूळ पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सगळ्या अभिनेत्रींनी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास होकार दिला आहे.
  कधी सुरू होणार शूटिंग? करीना कपूर लवकरच आई होणार आहे. 'वीरे दी वेडिंग'च्या सिक्वेलमध्येही करीनाची मुख्य भूमिका असणार आहे. त्यामुळे तिच्या डिलिव्हरीनंतरच सिनेमाच्या शूटला सुरुवात होणार आहे. करीनाची डिलिव्हरी झाल्यानंतर फिल्मचं शूट होणार असल्याची माहिती दिग्दर्शकांकडून मिळत आहे. गंमत म्हणजे 'वीरे दी वेडिंग'चा पहिला भाग येणार होता तेव्हाही करीना कपूर प्रेग्नंट होती. 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा काहीसा वेगळा होता. कारण या सिनेमामध्ये चारही महिलांच्या मुख्य भूमिका होत्या. 4 बड्या अभिनेत्री एकत्र येणार म्हणजे, सिनेमाच्या सोडून कॅटफाईटच्या चर्चाच जास्त होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाचं शूट अतिशय उत्तमरित्या पार पडलं होतं. बॉलिवूडचे चित्रपट हीरोच्या नावावर चालतात असा एक समज आहे. पण वीरे दी वेडिंगमध्ये एकही पुरुष कलाकार नसूनही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवला होता. आता लवकरच वीरे दी वेडिंगचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Kareena Kapoor, Sonam Kapoor

  पुढील बातम्या