Home /News /entertainment /

Veena Jagtap: वीणा जगतापची सेटवरची बेस्ट फ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, पाहा हा खास video

Veena Jagtap: वीणा जगतापची सेटवरची बेस्ट फ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, पाहा हा खास video

बिग बॉस फेम वीणा जगताप सध्या एका नव्या मालिकेतून आपल्या भेटीला आली आहे. ती या मालिकेबद्दल काय सांगते पाहा.

    मुंबई 25 जून: (Star Pravah) स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेत सध्या बराच ट्विस्ट येताना दिसत आहे. या मालिकेत एका नव्या पात्राच्या येण्याने बरीच खळबळ माजताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगताप आहे. सध्या वीणा ‘अवंतिका कानिटकर’ हे पात्र साकारत आहे. कानिटकर कुटुंबात आलेल्या या आगंतुक पाहुण्याच्या चाहुलीने बरीच उत्सुकता तर आहेच त्याचसोबत ही अवंतिका नेमकी कोण आहे तिचा इतिहास काय याबद्दल बरेच प्रश्न सुद्धा चाहत्यांच्या मनात आहेत. वीणा या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याआधी तिने दोन मालिका केल्या असल्या तरी तिच्यासाठी हा अनुभव खास असल्याचं ती राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगते. याचसोबत तिने या मुलाखतीत तिच्या सेटवरच्या बेस्ट फ्रेंडबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. तिची आणि मालिकेतील अप्पू अर्थात ज्ञानदा रामतीर्थकर या अभिनेत्रीची चांगलीच गट्टी जमलेली दिसत आहे. ज्ञानदा आणि वीणा कमी काळात एकमेकांच्या खास मैत्रिणी झाल्या आहेत. “ही मालिका माझ्यासाठी बरीच खास आहे. सेटवरचं वातावरण खूपच छान आहे. मला सगळ्यांनीच आपलंस करून घेतलं. मला आधी वाटलंच नाही की हा माझा पहिला दिवस आहे. सेटवर मी शरद सरांना भेटले, सुप्रिया ताईंना भेटले. ज्ञानदाला सुद्धा भेटले. ज्ञानदा पर्सनली खूप गोड आहे. ती मला वेलकम करायला रूममध्ये आली आणि आमच्या गप्पाच सुरु झाल्या. आणि आमचं छान कनेक्शन झालं. आम्ही एकत्र बसून गप्पा मारल्या, जेवलो. मला असं अजिबात वाटलं नाही मी तिला पहिल्यांदा भेटत आहे. ती प्रचंड गोड आहे.” असं वीणा तिच्या एकूण अनुभवाबद्दल आणि खास करून ज्ञानदा बद्दल सांगते. वीणा बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिने तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. वीणा यानंतर आणखी दोन मालिकांमध्ये सुद्धा दिसली. ती या नव्या मालिकेत किती काळ आहे हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी जितका काळ ती यात दिसेल तोवर मालिका एकदम सुंदर वळणावर असणार आहे. यानंतर सुद्धा मालिकेत खूप सुंदर ट्विस्ट येणार असे संकेत सुद्धा तिने दिले आहेत.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Marathi actress, Tv actress, Tv serial

    पुढील बातम्या