S M L

काय म्हणता, रणवीर-दीपिकानं वरुण धवनला 'दत्तक' घेतलं?

वरुणनं रणवीर-दीपिका सोबत एक व्हिडीओ बनवून इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता. यात त्यानं दीपिका आणि रणवीर त्याचे आई-वडील असल्याचं सांगितलं आहे

Updated On: Mar 15, 2019 02:48 PM IST

काय म्हणता, रणवीर-दीपिकानं वरुण धवनला 'दत्तक' घेतलं?

मुंबई, 15 मार्च 2019 : अभिनेता वरुण धवन सध्या आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू असून वरुण नुकताच आगामी सिनेमा 'कलंक'च्या टीझर लाँचसाठी मुंबईला आला होता. लाँचनंतर तो पुन्हा रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबतच लंडनला रवाना झाला. यावेळी वरुणनं रणवीर-दीपिका सोबत एक व्हिडीओ बनवून इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीरनं आपल्याला दत्तक घेतल्याचा उल्लेख वरुणनं केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दीपिका-रणवीर वरुणसोबत एअरपोर्टवरील गाडीत बसलेला दिसत आहेत. 'रणवीर आणि दीपिकानं मला दत्तक घेतलं आहे', असं वरुण व्हिडीओद्वारे सांगतो. त्यावर दीपिकासुद्धा त्याला आईप्रमाणे गोंजारत आहे, ती वरुणला कसं सांभाळते, हे देखील सांगत आहे. या गंमतीदार व्हिडीओला रणवीर-दीपिका आणि वरुणच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सोशल मीडियावर दीपवीरच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे असून त्यांचा हा धम्माल व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 


Loading...
View this post on Instagram

 

A post shared by Varun Dhawan FC (@hqvarundhawan) on

आगामी सिनेमा 'स्ट्रीट डान्सर'मध्ये वरुण पुन्हा एकदा श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. वरुण-श्रद्धा ही जोडी यापूर्वी 'एबीसीडी- 2' मध्येही एकत्र दिसले होते. याव्यतिरिक्त धर्मा प्रॉडक्शनच्या 'कलंक'मध्येही वरुण महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.  17 एप्रिलला 'कलंक' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीपिका पदुकोण मेघना गुलजार यांच्या 'छपाक' या बायोपिकमध्ये अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारणार आहे आणि रणवीर सिंह क्रिकेटपटू कपिल देवच्या जीवनावर आधारित बायोपिक '83'ची तयारी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 02:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close