सनई चौघडे वाजणार! बॉलिवूडच्या 'या' चॉकलेट हिरोनं बालपणीच्या मैत्रिणीशी गुपचूप केला साखरपुडा?

या अभिनेत्यानं मागच्याच वर्षी आपल्या बालमैत्रिणीशी गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 11:19 AM IST

सनई चौघडे वाजणार! बॉलिवूडच्या 'या' चॉकलेट हिरोनं बालपणीच्या मैत्रिणीशी गुपचूप केला साखरपुडा?

मुंबई, 9 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन मागच्या काही काळापासून त्याच्या सिनेमांपेक्षा खासगी जीवनामुळे खूप जास्त चर्चेत आहे. वरुण त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल बद्दल फारसा कधी बोलताना दिसत नाही मात्र त्यानं नताशासोबतच नातं अनेकदा कबूल केलं आहे. पण सध्या अशी चर्चा आहे की, वरुणनं या नात्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. वरुणनं त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. तसेच तो लवकरच नताशाशी लग्नगाठ बांधाण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.

देसी मार्टिन या वेबसाइटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वरुण धवननं गर्लफ्रेंड नताशासोबत 2018 मध्येच साखरपुडा केला आहे. या दोघांच्याही नात्याला त्यांच्या कुटुंबीयांचीही मान्यता असल्यानं त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साखरपुडा उरकला असल्याचं या वेबसाइटनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण याची माहिती मीडियापर्यंत पोहोचू नये यासाठी त्यामुळे हा कार्यक्रम खूपच खासगी ठेवण्यात आला होता. या सेरेमनीमध्ये वरुण आणि नताशाच्या फॅमिली व्यतिरिक्त 1-2 जवळचे मित्रमैत्रिण उपस्थित होते. पण या सिक्रेट साखरपुड्याच्या बातमीत कितपत तथ्य आहे हे वरुण किंवा नताशाच्या प्रतिक्रियेनंतरच समजेल. मात्र या दोघांनीही यावर बोलणं टाळलं आहे.

...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, विद्या बालनची प्रतिक्रिया

Loading...

 

View this post on Instagram

 

Happy diwali 👷‍♂️👩🏻‍⚕️

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

वरुण-नताशा यावर्षी लग्न करणार असल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तसं पाहायला गेलं तर मागच्या बऱ्याच काळापासून वरुण यावर्षी लग्न करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. वरुणला अनेकदा नताशासोबत स्पॉट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या नाइट पार्टीमध्येही हे दोघंही एकत्र दिसले होते. नताशा आणि वरुण एकमेकांना बालपणापासून ओळखतात. तसेच यांच्या फॅमिलींमध्येही खूप चांगले संबंध आहेत.

...आणि चक्क अक्षय कुमारनं धरले विद्या बालनचे पाय!

वरुणच्या सिनेमांबद्दल बोलायचं तर सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'स्ट्रीट डान्सर 3D'च्या प्रमोशनची तयारी करत आहे. या सिनेमाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून या सिनेमात वरुणसोबत श्रद्धा कपूर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय वरुण 'कुली नंबर 1'च्या रिमेकमध्येही दिसणार आहे. यामध्ये सारा अली खान त्याच्यासोबत दिसणार आहे.

'या' मराठमोळ्या हिरोईनसाठी दबंग सलमाननं सेटवर केली मोबाइल बंदी, कोण आहे 'ती'?

========================================================================

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...