मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा पुढे ढकलून वरूण धवन अडकणार लग्नबंधनात

चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा पुढे ढकलून वरूण धवन अडकणार लग्नबंधनात

वरुण धवनच्या लग्नाच्या तारखेपासून ते हनिमूनपर्यंत सर्व काही ठरलय. लवकरच वरुण गर्लफ्रेन्डसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

वरुण धवनच्या लग्नाच्या तारखेपासून ते हनिमूनपर्यंत सर्व काही ठरलय. लवकरच वरुण गर्लफ्रेन्डसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

वरुण धवनच्या लग्नाच्या तारखेपासून ते हनिमूनपर्यंत सर्व काही ठरलय. लवकरच वरुण गर्लफ्रेन्डसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई,17 जानेवारी: अभिनेता वरुण धवनच्या लग्नाच्या तारखेपासून ते हनिमूनच्या नियोजनापर्यंत सर्व काही ठरल्याच्या बातम्या सुरु आहेत. वरूण धवन लवकरच त्याची गर्लफ्रेन्ड नताशासोबत लग्न करणार आहे. 2019 मध्येच वरूणचं लग्न होणार होतं मात्र चित्रपटाच्या शुटिंगच्या तारखांमुळे लग्नाची तारिख पुढे गेली त्यामुळे आता यंदा कर्तव्य होणार आहे. वरूण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डांसर 3D'मध्ये व्यस्त आहे. तिथेच त्याच्या 'कुली नंबर 1' या चित्रपटाचं शूटींगही पुर्ण झालं आहे. आता त्याने शशांक खेतान यांचा 'मिस्टर लेले' हा चित्रपटही साइन केला आहे. परंतु या चित्रपटाचं काम सुरु होण्याआधी वरूण ने लग्नाचं नियोजन पुर्ण तयारीने केलं आहे असं सांगण्यात येत आहे. यामध्ये वरुण-नातशाच्या लग्नापासून ते हनीमूनपर्यंत सर्वं नियोजन झाल्याचं कळतंय. लग्नाचे कपडे डिझाइन करणार मनीष मल्होत्रा बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयचं लग्न म्हटलं तर चर्चा होणारच. वरूण धवनच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची मोठी उत्सुकता लागलीय. त्याचा लग्नातला लूक कसा असेल, वरूण लग्न कुठे करणार, लग्नात कपडे कोणते घालणार अशी सगळी उत्सुकता असताना लग्नाबाबत एक खास माहिती सांगण्यात आलीये. वरूण धवनचे लग्नातले कपडे सुप्रसिद्ध डिझाइनर मनिष मल्होत्रा डिझाइन करणार असल्याचं कळतंय. मनिषा मल्होत्रासोबत वरूणची गर्लफ्रेंन्ड नताशा देखील कपडे डिझाइन करणार आहे. कारण नताशा स्वत: देखील फॅशन डिझाइनर आहे. दोघांचं लग्न गोव्यात होणार असल्याचं समजतं. निक जोनसचं नवं गाणं रिलीज, फक्त शर्ट घालून BOLD डान्स करताना दिसली प्रियांका
View this post on Instagram

Let there be snow ☃️💙wishing everyone out there a very happy new year 2020

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

कोण आहे वरूणची होणारी बायको नताशा दलाल असं वरूणच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. 16 मार्च 1989 ला मुंबई मध्ये तिचा जन्म झाला. नताशा च्या वडीलांचं नाव राजेश दलाल असं आहे आणि ते व्यवसायाने बिझनेसमन आहेत. नताशा देखील वडीलांच्या पावलावर पाउल टाकत एक यशस्वी बिजनेस वूमन झाली आहे. तर नताशा दलालच्या आईचं नाव गौरी दलाल आहे.नताशाने फॅशन डिजाइनिंगची डिग्री घेतली आहे. 2013 मध्ये नताशा ने फॅशन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्क मधून शिक्षण पुर्ण केलं. शिक्षण पुर्ण केल्यानंतर नताशाने डिझाइनिंग क्षेत्रातच काम करण्यास सुरूवात केली. आज इंडस्ट्रीत तिचं चांगलं नाव आहे. तिच्या कपड्यांचा एक ब्रॅंडही आहे. जो बॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांच्या पसंतीस उतरलाय. Love Aajkal Trailer : कार्तिक-साराची सिझलिंग केमिस्ट्री! करण जोहर च्या शो मध्ये वरुणने त्याच्या आणि नताशाच्या नात्याबद्दल जाहिरपणे सांगितलं होतं. नताशावर प्रेम असल्याची कबुली देत आपण तीला डेट करत असल्याचं त्यानं म्हटलं होतं. याच कार्यक्रमात त्याने आपण लवकरच लग्न करणार असल्याचेही संकेत दिले होते. नताशाबद्दल बोलतान वरुण म्हणाला कि नताशा शाळेत असल्यापासून त्याला खूप सहकार्य करत आली आहे. माझ्या चांगल्या-वाईट काळात प्रत्येक वेळी ती माझ्यासोबत होती. वरूण असंही म्हणाला की, नताशाने तिची स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि मला नताशाची आणखी स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिची मदत करायची आहे. मला नताशा सोबत रहायला आवडतं अशी भावनाही त्याने बोलून दाखवली. वरूण धवनचे चाहतेही त्या दोघांना एकत्र पाहणं पसंत करतात. लग्नाआधीच प्रेग्नन्ट आहे कल्कि, अभिनेत्रीनं सांगितली काय होती आईची प्रतिक्रिया
First published:

Tags: Bollywood, Varun dhavan

पुढील बातम्या