Home /News /entertainment /

JugJugg Jeeyo Box Office Collection: 7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

JugJugg Jeeyo Box Office Collection: 7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

जुग जुग जियो या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. प्रत्येक दिवशी चित्रपटाने आधीच्या दिवसाचा रेकॉर्ड मोडलाय. जाणून घ्या सिनेमाचं सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन.

  मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'जुग जुग जियो' (JugJugg Jeeyo) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. प्रत्येक दिवशी चित्रपटाने आधीच्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला. (JugJugg Jeeyo box office collection Day 7) आजतकने दिलेल्या वृत्तानुसार,  जुग जुग जियो हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या सातव्या दिवशी चित्रपटाने एकूण ८५ कोटींची एवढी कमाई केली आहे. मागच्या आठवड्यात म्हणजे २४ जून रोजी  हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. राज मेहता यांनी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रदिसाद दिला आहे. काही प्रेक्षकांना चित्रपट मनोरंजक वाटलं तर काहींनी चित्रपट बोरिंग असल्याचं मत व्यक्त केलं आहे. असं असलं तरीसुद्धा पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर  ५० कोटींपेक्षा जास्त  कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ८५ कोटींची कमाई केली असून भारतात ५३ कोटी कमावले आहेत. तर येत्या काही काळातच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज चित्रपट तज्ञांनी लावला आहे. जुग  जुग जियो या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अलीकडे प्रदर्शित झालेल्या  भूल भुलैय्या २, सम्राट पृथ्वीराज, द काश्मीर फाईल्स आणि गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांना जोरदार धडक दिली आहे.  जुग  जुग जियो या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

  हेही वाचा - रणबीरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार मराठमोळा अभिनेता; स्टार प्रवाहवर साकारतोय महत्त्वाची भूमिका याआधी कार्तिक आर्यन आणि कियारा  अडवाणी यांच्या भूल भुलैय्या २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. दिगदर्शक अनीस बजमी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने वर्ल्ड वाईड २३० कोटींपेक्षा जास्त  कमाई केली होती. येणाऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आर माधवनचा 'रॉकेटरी' आणि आदित्य रॉय कपूरचा 'ओम' हे दोन नवीन  चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रदर्शित होताच रॉकेटरी या चित्रपटाला समीक्षकांनी चांगले रिव्हयुज दिले आहेत. आता येणाऱ्या काळात हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करताय  हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याचप्रमाणे जुग  जुग  जियोच्या कमाईवर काही परिणाम होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Marathi entertainment

  पुढील बातम्या