Home /News /entertainment /

वरुण धवन कियारा अडवाणीच्या Jug Jugg Jeeyoचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वरुण धवन कियारा अडवाणीच्या Jug Jugg Jeeyoचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वरुण धवन किआरा अडवाणीच्या Jug Jugg Jeeyoचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वरुण धवन किआरा अडवाणीच्या Jug Jugg Jeeyoचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितू कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jeeyo Trailer) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

  मुंबई, 22 मे : अभिनेता वरुण धवन (varun dhawan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) यांच्या 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jeeyo Trailer) या सिनेमाची बरेच दिवस चर्चा होती. प्रेक्षकही सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. सिनेमात वरुण आणि कियारा यांच्यासह तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. अभिनेता अनिल कपूर, नितू कपूर, मनीष पॉल आणि मराठामोळी प्राजक्ता कोळी देखील दिसणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता सिनेमाची आतुरता आहे. वरुण आणि कियारा ट्रेलरमध्ये विवाहीत आहे. परंतु दोघे त्यांच्या नात्यात आनंदी नाहीत. दोघांना त्यांच्या नात्यातून विभक्त व्हायचं आहे. तर दुसरीकडे अभिनेता अनिल कपूर आणि नीतू कपूर यांनी त्यांच्या आई वडिलांची भूमिका निभावली आहे. मुलांचा घटस्फोट होणार याने ते देखील चिंतेत दिसत आहेत. एकूणच जुग जुग जियो हा सिनेमा पुरेपुर फॅमिली एंटरटेनिंग आहे. हेही वाचा -  कार्तिक आर्यनला कधीच बदलायची नाही आपली 'ही' इमेज, अभिनेत्याने केला खुलासा
  2 मिनीटे 54 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवातच वरुण आणि कियाराच्या लग्नाने होते आणि पुढच्याच संकदात दोघे आम्हाला घटस्फोट हावा असं म्हणतात. वरुण अनिल कपूर यांच्यातही रंगलेली जबरदस्त केमिस्ट्री देखील ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधून सिनेमातील धमाकेदार गाणी देखील समोर आली आहेत. तर नितू कपूर काहीशी इमोशन झालेली दिसतेय. मस्ती, इमोशन्स, प्रेम,कॉमेडी असा फॅमिली ड्रामा सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेता वरुण धवन सह कियाराने देखील तिच्या सोशल मीडियावर सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर शेअर केला आहे. 'भेटा कुकुला आणि फॅमिली रियूनियनसाठी तयार रहा', असे म्हणत वरुण धवनने त्याच्या सोशल मीडियावर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. सिनेमाचे प्रमोशन देखील दमदार सुरू असून वरुण आणि सिनेमाच्या इतर स्टार्सचे मोठे मोठे कटआऊट लावण्यात आले आहेत. सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि वायकॉम18 ने केली आहे. तर राज मेहताने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. जुग जुग जियो हा सिनेमा 24 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood News, Kiara advani, Varun Dhawan

  पुढील बातम्या