...आणि 18 तासांच्या शूटनंतर वरुण धवन चक्कर येऊन सेटवरच बेशुद्ध झाला

काही दिवसांपूर्वी वरुणनं त्याच्या वडीलांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या वडीलांनी ओव्हर टाइम केला असल्याचं सांगितलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 02:55 PM IST

...आणि 18 तासांच्या शूटनंतर वरुण धवन चक्कर येऊन सेटवरच बेशुद्ध झाला

मुंबई, 27 जुलै : अभिनेता वरूण धवन मागच्या काही दिवासांपासून त्याचा आगामी सिनेमा ‘Super Dancer 3D’ मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाचं शूट नुकतंच संपलं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. पण काही दिवसांपूर्वी वरुणनं त्याच्या वडीलांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या वडीलांनी ओव्हर टाइम केला असल्याचं सांगितलं होतं. मात्र यानंतर नुकतंच त्याच्या आगमी सिनेमाचं शूटिंग पूर्ण होण्याआधी जवळपास 18 तासांचं शूटिंग केल्यानं वरुण धवन ब्लड प्रेशर कमी झाल्यानं सेटवरच चक्कर येऊन पडला.

वरुण धवन या सिनेमाचं शूट जवळपास 18 तास शूट करत होता. ‘मिड डे’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वरुण ज्यावेळी सेटवर आला त्यावेळी त्याला ताप आणि सर्दीचा त्रास होत होता. पण तरीही त्यानं सहकलाकारांसोबत शूट चालूच ठेवलं. पण सिनेमाच्या रॅपअप अगोदर ब्लड प्रेशर कमी झाल्यानं वरुणला चक्कर आली आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर सिनेमाचं शूट थांबवण्यात आलं असून आता दोन दिवसांनंतर उर्वरित शूट पूर्ण केलं जाणार आहे.

रात्रीस खेळ चाले : ... म्हणून लग्नानंतर छाया माहेरी परतते

सूत्रांच्या माहितीनुसार वरुणची तब्बेत ठीक नव्हती मात्र त्यानं स्वतःहूनच मी डबल शिफ्ट करू शकतो असं दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे टीमला दुपारी 1 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 असं शेड्यूल देण्यात आलं होतं. याशिवाय याच दिवशी वरुणला एका जाहीरातीचही शूट पूर्ण करायचं होतं जे त्याला रद्द करता येणं शक्य नव्हतं.

भर पावसात रणबीर, अभिषेक, अर्जुन, इशान यांचा फुटबॉल गेम रंगला; PHOTO व्हायरल

Loading...

वरुणनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडीलांचा म्हणजे डेव्हिड धवन यांचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याचे बाबा त्यांच्या स्ट्रगल स्टोरी सांगताना दिसले होते. यामध्ये त्यांनी सकाळी 9 ते 5 आणि पुन्हा संध्याकाळी 8 ते सकाळी 4 अशी डबल ड्यूटी केली असल्याचा उल्लेख केला होता.

हा व्हिडिओ शेअर करताना वरुणनं लिहिलं, माझ्या बाबांचं त्यांच्या सिनेमासाठीचं शेड्यूल आणि माझं शेड्यूल. मला ताप असताना जेव्हा मी काम केलं तर मला ते खूप कठीण वाटलं. हे माझ्या बाबांनी मला सांगितलं की, ते कशाप्रकारे डबल शिफ्ट करत असत. त्यावेळी शूटिंगसाठी एवढं चांगल्या अद्यावत सुविधा उपलब्ध नव्हत्या तरीही त्यांनी हे सर्व केलं होतं.

शाहरुख खानसोबत 'हा' सीन शूट करताना मलायका अरोरा झाली होती रक्तबंबाळ

=====================================================================

महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहूबाजुंनी पाण्याचा वेढा, डब्यात पाणी शिरल्यानं प्रवाशांमध्ये भीती, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...