वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने मार्च 2022 मध्ये जान्हवीसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. अंशुला कपूरने देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या सेलेब्जनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्यांचा आनंद शेअर केला होता. हे वाचा-अनिल कपूरने हात जोडत अनुपम खेर यांना केली ही विनंती, पाहा Video! रोहितने देसी बॉइझ (2011) या चित्रपटात दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्यात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण आणि चित्रंगदा सिंग या मुख्य भूमिकेत मुख्य भूमिकेत होते. संजय दत्तने देखील यामध्ये कॅमिओ केला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमाने बऱ्यापैकी कमाई केली होती. 2016 मध्ये त्याचा दुसरा चित्रपट डिशूम रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन, क्रिती सॅनॉन, परेश रावल आणि मनीषा कोइराला यांची मुख्य भूमिका असणारा शहजादा हा सिनेमा यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Varun Dhawan