...जेव्हा टुरिस्टनी वरुण धवनला हॉटेल स्टाफ समजून घासायला लावली होती भांडी

...जेव्हा टुरिस्टनी वरुण धवनला हॉटेल स्टाफ समजून घासायला लावली होती भांडी

एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टुरिस्टनी वरुण धवनला हॉटेल स्टाफ समजून भांडी घासायला लावली होती. वाचा नेमकं काय घडलं

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमा देणारा वरुण केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर धमाकेदार डान्ससाठी सुद्धा ओळखला जातो. फिल्मी बॅकग्राऊंड असताना वरुण त्याची स्वतःची ओळख मात्र स्वतःच बनवली. त्याचे वडील आणि भाऊ रोहित धवन दोघंही दिग्दर्शक आहे. मात्र वरुणनं अभिनेता बनायचं ठरवलं आणि ते सिद्धही केलं. पण एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टुरिस्टनी वरुण धवनला हॉटेल स्टाफ समजून भांडी घासायला लावली होती.

वरुण धवननं नॉटिंघम ट्रेंट यूनिव्हर्सिटी मधून बिजनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यानं सिनेमात काम करण्याचं ठरवलं आणि करण जौहरसोबत त्यानं शाहरुख आणि काजोलतच्या माय नेम इज खान या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं.

राखी सावंतनं शेअर केला BIKINI PHOTO, सोशल मीडियावर बोल्ड टॅटूची चर्चा

View this post on Instagram

Pg-13

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

2012 मध्ये वरुणनं अभिनेता म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. करण जौहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' या सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं. या सिनेमात त्याच्यासोबच आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसले होते. यानंतर वरुण 'मैं तेरा हीरो', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'दिलवाले', 'बदलापुर', 'एबीसीडी 2', 'ढिशूम', 'जुड़वा 2', 'अक्टूबर' 'स्ट्रीट डांसर 3 डी', आणि 'कलंक' या सिनेमांत दिसला. ज्यात त्याच्या अभिनयचं खूप कौतुक झालं.

संजय लीला भन्साळी तोडणार 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट, वाचा काय आहे कारण

View this post on Instagram

Music on Worries off #haveagreatday

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

एका मुलाखतीत वरुणनं सांगितलं होतं की जेव्हा तो 11 वर्षांचा होता त्यावेळी त्यानं पोलीसांना फोन केला होता. कारण होतं त्याच्या शेजारच्या घरात होतं असलेले कौटुंबिक अत्याचार. ज्याच्या विरोधात आवाज उठवत त्यानं पोलीसांना फोन केला होता. वरुणला खरं तर रेसलर व्हायचं होतं. मात्र नंतर त्याचं मन बदललं आणि त्यानं सिनेमात काम करायचं ठरवलं.

लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याचा आरोप, अभिनेत्री अनिता राजच्या घरी पोहोचले पोलीस

View this post on Instagram

Jab mein gym jata tha ab toh mein bas ghar pe hoon ❤️

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

'अक्टूबर' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा एक मजेशीर किस्सा वरुणनं एका मुलाखतीत सांगितला होता. या सिनेमाचं शूटिंग एका 5 स्टार हॉटेलमध्ये झालं होतं. ज्यात शूटिंग दरम्यान एका विदेशी कपलनं त्याला खराखुरा हॉटेल स्टाफ समजलं होतं आणि त्याला रुम सर्व्हिससाठी बोलवून घेतलं. वरुणनं स्वतः एक स्टार आहे हे विसरुन त्यांचं सर्व काम केलं.

(संपादन - मेघा जेठे.)

First published: April 24, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या