वरुणचा 'आॅक्टोबर' 13 एप्रिलला रिलीज

'जुडवा-2' सिनेमाच्या भरघोस यशानंतर अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी 'ऑक्टोबर' सिनेमाच्या जोरदार तयारीला लागलाय. सुजीत सरकार दिग्दर्शित या सिनेमातून अभिनेत्री बनिता सिंधू पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2017 01:36 PM IST

वरुणचा 'आॅक्टोबर' 13 एप्रिलला रिलीज

31 आॅक्टोबर : 'जुडवा-2' सिनेमाच्या भरघोस यशानंतर अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी 'ऑक्टोबर' सिनेमाच्या जोरदार तयारीला लागलाय. सुजीत सरकार दिग्दर्शित या सिनेमातून अभिनेत्री बनिता सिंधू पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे. या सिनेमाची रिलीज डेटही अखेरीस फायनल करण्यात आलीये.पुढील वर्षी 13 एप्रिलला 'ऑक्टोबर' सिनेमा रिलीज होणार असल्याचं वरुणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितलंय.

शूजित सरकार दिग्दर्शित आॅक्टोबर ही एक प्रेमकथा आहे. वरुण धवनभोवती सिनेमा फिरतो. असं म्हणतात हाॅलिवूडच्या 'हर' सिनेमावर हा बेतलाय.

बनिता एका जाहिरातीत झळकली होती आणि याच जाहिरातीला मिळालेली प्रसिद्धी पाहून सुजीतने मुख्य अभिनेत्री म्हणून तिची निवड केलीये. आता वरुण-बनिताची ही नवी जोडी प्रेक्षकांना कितपत भावते हे सिनेमाच्या रिलीजनंतरच कळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...