VIDEO : वरुण धवननं दिलं आपल्या वडिलांना खास गिफ्ट

VIDEO : वरुण धवननं दिलं आपल्या वडिलांना खास गिफ्ट

नेहमी शूटिंग, प्रमोशन्स यातच बिझी असलेली ही मंडळी घरच्यांसाठी कसा क्वालिटी टाईम देत असतील असे प्रश्न नेहमीच पडतात. वरुण धवननं आपल्या बाबांसाठी एक सरप्राईझ दिलंय.

  • Share this:

मुंबई, 22 आॅगस्ट : बाॅलिवूडमधल्या नात्यांवर सगळ्यांचंच  लक्ष असतं. हे स्टार्स आपापल्या घरी कसे वागतात, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. म्हणजे  ऐश्वर्या राय बच्चन सासू-सासऱ्यांशी काय गप्पा मारत असेल किंवा सनी देओल आपले वडील धर्मेंद्रशी कुठल्या विषयावर चर्चा करत असेल, असे प्रश्न फॅन्सना नेहमीच पडत असतात. कारण नेहमी शूटिंग, प्रमोशन्स यातच बिझी असलेली ही मंडळी घरच्यांसाठी कसा क्वालिटी टाईम देत असतील असे प्रश्न नेहमीच पडतात. वरुण धवननं आपल्या बाबांसाठी एक सरप्राईझ दिलंय.

वरुण धवन 'सुई धागा' सिनेमा झाल्यानंतर खरोखरच शिवणकलेत पारंगत झाला आहे, याचा प्रत्यय नुकताच आला. वरुण धवनने त्याचे बाबा म्हणजेच लोकप्रिय दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या वाढदिवसाला त्यांना एक खास भेट दिली. 'पापा देखो तुम्हारा बेटा 'सुई धागा' में माहिर हो गया है.' असं लिहीत त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ चक्क शेअर केला, यात वरुण धवन शर्टाची शिलाई करताना दिसतोय.

एका पारंगत टेलरप्रमाणे वरुण सफाईने हे काम करतोय. आपल्या हातांनी शिवलेला शर्ट वडिलांना देत वरुणने डॅडी धवन यांचं मन तर जिंकलंच सोबत त्याच्या चाहत्यांचं देखील. वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या 'सुईधागा' सिनेमाची खूप चर्चा आहे. सिनेमा सर्वसामान्यांच्या आयुष्यावरच आहे. दर शूटिंगच्या वेळचे फोटोज सोशल मीडियावर शेअर झालेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालंय. या चित्रपटाचं प्रमोशन वेगळ्या पद्धतीनं करण्याचं ठरवलंय.

अनुष्काने तिच्या ट्विटर अकाउंटवर हे चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने या पोस्टरसोबत ‘धागे धागे पे लिखा है, सिलने वाले का नाम’ असे ट्विट करून वेगळ्या पद्धतीने प्रमोशन केले आहे. त्याच बरोबर 31 ऑगस्टला याचा ट्रेलर येत असल्याचेही तिने यावेळी सांगितले. या पोस्टरमध्ये वरुण एक सामान्य टेलरच्या वेशात आहे, तर अनुष्का त्याच्या पत्नीची भूमिका साकारत असल्याचे दिसत आहे.

First published: August 22, 2018, 10:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading