वरूणने मागितली कंगनाची माफी

आयफाच्या मंचावर वरूणने कंगना राणावतची खिल्ली उडवली होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 08:36 PM IST

वरूणने मागितली कंगनाची माफी

18जुलै:आयफा अवार्ड्समध्ये धमाकेदार परफोर्मन्स करणाऱ्या वरूण धवनने कंगना राणावतची नामोल्लेख न करता माफी मागितलीय. आयफाच्या मंचावर वरूणने कंगना राणावतची खिल्ली उडवली होती.

कंगना राणावतचा बॉलिवूडमध्ये स्टार किड्सप्रती होत असलेल्या पक्षपातीपणाला असलेला विरोध जगजाहीर आहे. करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत तिने या पक्षपातीपणाला असलेला विरोध प्रकटही केला होता. याचीच आयफाच्या मंचावर न्यूयॉर्कमध्ये खिल्ली उडवली गेली होती. सैफ आणि करण या सोहळ्याचे सुत्रसंचालन करत होते. जेव्हा वरूण धवन त्याला जाहीर झालेला कॉमिक रोलचा पुरस्कार घ्यायला स्टेजवर आला तेव्हा सैफने वरूणला त्याचे वडिल दिग्दर्शक असल्याची आठवण करून दिली. वरूणने हा जोक हसण्यावारी नेला आणि 'बोले चुडिया बोले कंगना' हे गाणं गुणगुणायला लागला. त्यावर करण म्हणाला ,"कंगना नाही बोलली तरच बरंय किती बोलते यार".वरूणने मंचावरून गंमती गंमतीत या पक्षपातीपणास पाठिंबाही दिला होता. या साऱ्यामुळे तो सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल झाला होता.अखेर या प्रकरणावर पडदा घालण्यासाठी कंगनाचं नाव न घेता वरूणने ट्विट करून माफी मागितली आहे. जर मी कुणाला दु:खावले असेल तर मला माफ करावे असं त्याने ट्विटरवर पोस्ट केलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...