वरूण-अनुष्काची देसी लव्ह स्टोरी

वरूण-अनुष्काची देसी लव्ह स्टोरी

'सुई धागा-मेड इन इंडिया' असं या सिनेमाचं नाव असून शरत कटारिया सिनेमाचं दिग्दर्शन करतील.

  • Share this:

05जुलै: वरुण धवन आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहायला मिळणारेत.यशराज फिल्मच्या पुढच्या सिनेमात वरुण आणि अनुष्का मुख्य भूमिकेत दिसतील.'सुई धागा-मेड इन इंडिया' असं या सिनेमाचं नाव असून शरत कटारिया सिनेमाचं दिग्दर्शन करतील.

'दम लगा के हैशा''ची प्रचंड वाहवाही झाल्यानंतर शरत कटारिया आता एक नवा देसी सिनेमा घेऊन येतोय. सुई धागा मेड इन इंडिया असं या सिनेमाचं नाव असून गांधीजींच्या स्वयंशिस्त,स्वावलंबन या मूल्यांवर हा सिनेमा आधारित असेल. हा सिनेमा प्रत्येक भारतीयाशी रिलेट करेल असं दिगदर्शकाचं म्हणणं आहे.

'मला या सिनेमाची कथा फार आवडली.तसंच 'मेड इन इंडिया'चा मंत्र मला घरोघरी पोचवण्याची संधी या सिनेमातून मिळतेय आणि यासाठी मी फार उत्सुक आहे' असं वरुणने म्हटलंय.

या सिनेमाचं शूटिंग जानेवारी 2018मध्ये सुरु होईल तर गांधी जयंतीला हा सिनेमा रिलीज होईल. 'सुई धागा-मेड इन इंडिया' सिनेमातून वरुण-अनुष्काची केमिस्ट्री कितपत रंगते हे पाहणं रंजक ठरणार आहे.

First published: July 5, 2017, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading