• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • वर्षा उजगांवर म्हणतायेत 'आज जानेकी जिद ना करो...', पाहा अभिनेत्रीनं गायलेलं Exclusive गाणं

वर्षा उजगांवर म्हणतायेत 'आज जानेकी जिद ना करो...', पाहा अभिनेत्रीनं गायलेलं Exclusive गाणं

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता त्या लवकरच पुनरागमन करणार आहेत. यावेळी त्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करणार आहेत.

 • Share this:
  मुंबई 24 मे: वर्षा उजगांवरकर (Varsha Usgaonkar) या मराठी मनोरंजसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘गंमत जंमत’, ‘शेजारी शेजारी’, ‘हमाल दे धमाल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे त्यांनी जवळपास दोन दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या काही काळात त्या सिनेसृष्टीपासून दूर होत्या. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता त्या लवकरच पुनरागमन करणार आहेत. यावेळी त्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करणार आहेत. वर्षा उजगांवरकर (Varsha Usgaonkar Exclusive song) यांच्या एक्सक्लुझिव गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या एक शास्त्रीय गाणं गाताना दिसत आहेत. आज जानेकी जिद ना करो असे या गाण्याचे बोल आहे. हे गाणं त्यांनी एखाद्या तज्ज्ञ गायकाप्रमाणे गायलं आहे. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ युनिट बॉक्स या युट्यूब चॅनेलनं शेअर केला आहे. ‘तुझ्यामुळं मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’; अंजुम फकीह बिकिनी फोटोंमुळं होतेय ट्रोल वर्षा उजगांवरकर या उत्तम अभिनेत्री तर आहेतच पण सोबतच त्या एक उत्तम गायिका देखील आहेत. त्यांनी आजवर अनेकदा विविध कार्यक्रमांमधून आपल्या सुरेल आवाजाची झलक रसिकांना दाखवली आहे. त्यांनी सास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. अन् येत्या काळात त्यांची आणखीही काही गाणी ऐकायला मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते मात्र उत्साही झाले आहेत. त्यांनी प्रतिक्रियांद्वारे त्यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: