Home /News /entertainment /

Vanity Van ने चिरडलं; 'ती'च्या निधनाने सलमान हळहळला, PHOTO शेअर करुन म्हणाला...

Vanity Van ने चिरडलं; 'ती'च्या निधनाने सलमान हळहळला, PHOTO शेअर करुन म्हणाला...

salman khan

salman khan

या घटनेची माहिती समोर येताच मनोरंजन विश्वातील अनेकांनी सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली आहे

  मुंबई, 17 जानेवारी : रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) या कार्यक्रमाची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडचा (Pista Dhakkar) रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. अवघ्या 24 वर्षांची पिस्ता काम संपवून घरी जात असताना फिल्म सिटीच्या रस्त्यावरच हा अपघात झाला. यानंतर अनेकांनी ट्विट करुन तिच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. सलमान खान यांनेही पिस्तासोबतचा एक फोटो ट्विट करुन तिला श्रद्धांजली वाहिली आहे. (Salman was shocked by her demise shared a PHOTO) या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. अत्यंत हसरी, खेळती पिस्ता अचानक अशा प्रकारे निघून गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करीत दु:ख व्यक्त केलं आहे.
  अपघातापूर्वी गाडी खड्ड्यात पडली! ‘स्पॉटबॉय’ नं दिलेल्या वृत्तानुसार शूटिंग संपवून रात्री पिस्ता तिच्या स्कुटीवरुन घरी परतत होती. त्यावेळी रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी खड्ड्यांमध्ये पडली. त्यावेळी पाठीमागून येत असलेल्या व्हॅनिटी व्हॅननं पिस्ताला चिरडलं. (Salman was shocked by her demise shared a PHOTO) या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला. पिस्ता ‘बिग बॉस 14’ ची प्रॉडक्शन कंपनी 'एंडमोल शाइन इंडिया'मध्ये काम करत होती. तिनं ‘बिग बॉस’ शिवाय अन्य टीव्ही शो साठी देखील काम केलं आहे. ‘फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी’ आणि ‘द व्हॉईस’ या शो साठी तिनं काम केलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bigg boss, Salman khan

  पुढील बातम्या