बिकीनी घातली नाही म्हणून अभिनेत्रीचं झालं कोट्यवधीचं नुकसान

बिकीनी घातली नाही म्हणून अभिनेत्रीचं झालं कोट्यवधीचं नुकसान

वॉर सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिला बिकिनीमध्ये पाहण्यात आलं. याशिवाय बेफिक्रे या सिनेमातही तिला अनेकदा बिकिनीमध्ये पाहण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरच्या हातून एक मोठा ब्रँडची अँबेसिडर होण्याची संधी हुकली. तिच्या हातून ही संधी जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तिने बिकिनी घालण्यास मनाई केली. वॉर सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिला बिकिनीमध्ये पाहण्यात आलं. याशिवाय बेफिक्रे या सिनेमातही तिला अनेकदा बिकिनीमध्ये पाहण्यात आलं आहे. पण आता वाणीला तिची हीच इमेज बदलायची आहे. याचसाठी तिने हाती आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ब्रँडलाही नकार दिला.

स्किनकेअर प्रोडक्ट कंपनीने केली होती बिकिनी घालण्याची मागणी- मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वाणीला मिळालेली ही ऑफर एका बड्या कंपनीकडून होती. मात्र जाहिरातीच्या दिग्दर्शकांच्या मते, जाहिरातीत बिकिनी घालणं आवश्यक होतं. वाणीला जेव्हा ही गोष्ट सांगण्यात आली तेव्हा तिने बिकिनी घालायला स्पष्ट नकार दिला.

 

View this post on Instagram

 

Tropical state of mind 🏝☀️☘️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

विशेष म्हणजे वाणीला अनेक प्रोजेक्टमध्ये सहजरित्या बिकिनी घातलेली पाहण्यात आली आहे. पण तिच्यामते, जाहिरातीत बिकिनी घालणं योग्य नसेल. तिच्यामते, कोणत्याही सिनेमांपेक्षा जाहिराती जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. तसंच ती जाहिराती पुढे अनेक वर्ष वापरली जाते. अशात जर बिकिनी घालून तिने जाहिरात केली तर तिच्या इमेजला त्याचा त्रास होईल.

 

View this post on Instagram

 

Chic Happens 😎💕

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणी कपूरने शुद्ध देसी रोमान्स सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. वाणी म्हणाली की, तिचं करिअर आता कुठे सुरू झालं आहे. जर आत्ताच जर ती कोणत्या इमेजमध्ये अडकली तर करिअरमध्ये नुकसान होईल.

काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांच्या मदतीला धावला अक्षय कुमार!

लग्नाआधीच अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं ‘हे’ पाऊल

'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी

First published: July 18, 2019, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading