मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करिश्मासारखी दिसणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण? Mission: Impossible मध्ये झळकण्यास सज्ज

करिश्मासारखी दिसणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण? Mission: Impossible मध्ये झळकण्यास सज्ज

सेलेब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या लोकांबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. अशा डुप्लिकेट्सनाही(Duplicates) लोकांकडून मोठी पसंती मिळते.

सेलेब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या लोकांबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. अशा डुप्लिकेट्सनाही(Duplicates) लोकांकडून मोठी पसंती मिळते.

सेलेब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या लोकांबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. अशा डुप्लिकेट्सनाही(Duplicates) लोकांकडून मोठी पसंती मिळते.

  मुंबई 10 जुलै: जगात एकसारखे सात चेहरे असतात असं म्हटलं जातं. अनेकदा आपल्याला एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची आठवण होते किंवा त्या व्यक्तीला आधी पाहिल्यासारखं वाटतं. हा योगायोग खूपच मजेदार असतो. बॉलिवूड (Bollywood) सेलेब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या लोकांबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. अशा डुप्लिकेट्सनाही(Duplicates) लोकांकडून मोठी पसंती मिळते.

  बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे अनेक कलाकार त्यांची मिमिक्री करून लोकांचे मनोरंजन करत असतात. देव आनंद, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक कलाकारांचे डुप्लिकेट्स लोकप्रिय आहेत. सध्या मात्र एकसारख्या दिसणाऱ्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमधल्या (Hollywood) दोन सेलेब्रिटींची चर्चा आहे. या दोघीही अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. कोण आहेत या अभिनेत्री, असा प्रश्न पडला असेल ना? याचं उत्तर आहे बॉलिवूडमधली स्टार करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि हॉलिवूडमधली अभिनेत्री वनेसा किर्बी (Vanesaa Kirby).

  शिल्पा शेट्टीचं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या कौतुकाचा फुटला बांध; कमेंट्सचा झाला वर्षाव

  वनेसा आणि करिश्मा कपूर दोघींमध्ये खूपच साम्य (Looklike) आहे. या दोघींचे चेहरे एका बाजूनं पाहिले तर अगदीच सारखे दिसतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या दिसण्यातल्या या साम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. करिश्मा कपूर आणि वनेसा यांचे वेगवेगळ्या कोनातून काढलेले फोटो व्हायरल झाले आहेत.

  दोघीही अत्यंत गुणी अभिनेत्री आहेत. करिश्मा कपूर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला होता. अत्यंत यशस्वी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. करिश्माने 90च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 1991मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. राष्ट्रीय पुरस्कारासह चार फिल्मफेअर पुरस्कारांचीही ती मानकरी आहे. राजा हिंदुस्थानी, दिल तो पागल है, कुली नं. वन, जानवर आदी तिचे चित्रपट गाजले आहेत. लग्नानंतर बराच काळ ती चित्रपटापासून दूर होती. त्यानंतर अलीकडच्या काळात ती ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या मेंटलहूड (Mentalhood) वेबसीरिजमध्ये दिसली होती.

  'मसक्कली मसक्कली' मिथिलाच्या सौंदर्याने घातली भुरळ; पाहा अभिनेत्रीचे लेटेस्ट PHOTO

  वनेसा किर्बी ही हॉलिवूडमधली यशस्वी अभिनेत्री असून, 2010 मध्ये तिनं हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. वनेसा मिशन इम्पॉसिबल-7(Mission Impossible-7) आणि मिशन इम्पॉसिबल-8 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 33 वर्षीय वनेसा किर्बीनं आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी हॉलिवूडमधले मानाचे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. यात ब्रिटिश अॅकॅडमी अॅवॉर्ड, गोल्डन ग्लोब, अॅमी अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे. पिसेस ऑफ वूमन, फास्ट अँड फ्युरीयस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Hollywood