मुंबई, 07 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना हा तरूणांसाठी फार खास असते. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन विक सुरू झालाय. रोझ डे, प्रपोज डे, टेडी डे, चॉकलेट डे सारखे डे या विकमध्ये सेलिब्रेट केले जातात. व्हॅलेंटाईनसाठी अनेक जण खूप तयारी करत असतात. आज रोझ डे आहे. तुमच्या पार्टनर सरप्राइज देण्यासाठी तुमची काही तयार झाली नसेल तर काळजी करून नका. कारण बॉलिवूडची अनेक गाणी तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहेत. तुमच्या पार्टनरला खुश करण्यासाठी काही रोमँटिक बॉलिवूड गाणी तुमचा दिवस नक्कीच सुंदर करेल. कोणती आहेत ती गाणी पाहूयात.
गुलाबी आखे
मोहम्मद रफींच्या आवाजातील गुलाबी आखे जो तेरी देखी हे गाणं तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाठवू शकता. याचं गाण्याचं अतिफ असलमच्या आवाजातून अनप्लग्ड वर्जनही फार सुंदर आहे.
हाथो मे किताब, बालो में गुलाब
किशोर कुमार यांचं हे रोमँटिक गाणं तुमचा रोझ डे आणखी बहारदार बनवेल. व्हॅलेंटाईन विकची सुरूवात या गाण्यानं करायलाच हवी.
फूल गुलाब का
बीवी सिनेमातील अभिनेत्री रेखा आणि फारूख शेख यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं फूल गुलाब का हे रोमँटिक गाणं. हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचं गाणं आहे. तुम्ही हे गाणं तुमच्या पार्टनरला नक्कीच डेडिकेट करू शकता.
गुलाबी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि वाणी राजपूत यांच्या शुद्ध देसी रोमान्स सिनेमातील गुलाबी हे गाणं अनेक तरूणांचं आवडीचं गाणं असेल.
भेजा है एक गुलाब
शिकारी सिनेमातील भेजा है एक गुलाब आजच्या दिवसातील परफेक्ट गाणं असेल. कुमार सानू आणि आशा भोसले यांच्या आवाजानं गाण्याला चार चांद लावलेत.
फूल तुम्हे भेजा हैं खते में
तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरंच मनापासून प्रेम करत असाल तर फूल तुम्हे भेजा हैं खते में हे सुंदर गाणं नक्की पाठवा.
फूलो की रानी बहारो की मलिका
बॉलिवूडचं आणखी एक सदाबहार गाणं म्हणजे आरजू सिनेमातील फूलो की रानी बहारो की मलिका. अभिनेता राजेंद्र कुमार आणि साधना यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं.
फूल मांगू ना बहार मांगू
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांचं फूल मांगू ना बहार मांगू हे गाणं देखील तुमच्या व्हॅलेंटाईन विकची झक्कास सुरूवात करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News