Exclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री

Exclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री

सिंबा सिनेमात बरेच मराठी कलाकार आहेत. एक मराठी अभिनेत्रीही रणवीरसोबत दिसणार आहे.

  • Share this:

नीलिमा कुलकर्णी, प्रतिनिधी


मुंबई, 15 नोव्हेंबर : रणवीरच्या लग्नाच्या बातम्या तर भरपूर येतायत. लग्न झाल्यानंतर तो सिंबाच्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे. सिंबा सिनेमात बरेच मराठी कलाकार आहेत. एक मराठी अभिनेत्रीही रणवीरसोबत दिसणार आहे.


'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमानंतर वैदेही परशुरामी रणवीर सिंगसोबत दिसणार  आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत  वैदेही परशुरामी दिसणार आहे. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिनं घाणेकरांची दुसरी पत्नी कांचनचं काम केलंय. तिच्या कामाचं सगळीकडे कौतुक होतंय.


'रणवीरसोबत काम करणं ही एक फार आनंददायी गोष्ट आहे. कारण तो स्टारडममध्ये न अडकता सहकलाकारांसोबत मैत्री करतो आणि त्यामुळे दडपण येत नाही.' रणवीर दीपिकाला लग्नाच्या शुभेच्छा देत वैदेहीने exclusively News18 लोकमतला तिच्या बॉलिवूड इनिंगबद्दल सांगितलं.


अखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा!


इटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल


सलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी
सिंबा हा सिनेमा टेंपर या दाक्षिणात्य सिनेमावर बेतलाय. या सिनेमाचा मूळ दिग्दर्शक पुरी जगन्नाथनं अभिषेक बच्चनला हिरोच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. त्यानंतर सिनेमा हिंदीत बनत असताना रोहित शेट्टीनं अभिषेकला निगेटिव्ह रोलसाठी विचारलं होतं. पण त्यानं नकार दिला.


त्यानंतर रोहितनं नकारात्मक भूमिकेसाठी आर. माधवनला विचारलं होतं. पण माधवनला झालेल्या दुखापतींमुळे तो बाजूला झाला आणि सोनू सुद फायनल झाला.


करण जोहर निर्मित सिंबा चित्रपटात सारा अली खान दिसणार आहे. तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या या सिनेमात ती नायिकेच्या भूमिकेत असणार आहे.


सिंबामध्ये मराठी कलाकारांची फौजच आहे. सिद्धार्थसोबत सौरभ गोखले, विजय पाटकर, नंदू माधव यांच्याही भूमिका आहेत. रोहित शेट्टीचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्य भूमिकेत आहे रणवीर सिंग. मराठी कलाकारांना बाॅलिवूडमध्ये खूप आदर मिळतो. सिद्धार्थ जाधवच्या बाबतीत हेच झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 10:57 AM IST

ताज्या बातम्या