मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: आकाश ठोसरला पाहून अचानक किंचाळू लागली वैदेही परशुरामी; नेमकं काय घडलं?

VIDEO: आकाश ठोसरला पाहून अचानक किंचाळू लागली वैदेही परशुरामी; नेमकं काय घडलं?

आकाश ठोसर-वैदेही परशुरामी

आकाश ठोसर-वैदेही परशुरामी

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामीला ओळखलं जातं. वैदेही नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. अत्यंत कमी वेळेत सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी वैदेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 26 जानेवारी-  मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामीला ओळखलं जातं. वैदेही नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. अत्यंत कमी वेळेत सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी वैदेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री सध्या आपल्या 'जग्गू आणि ज्युलिएट' या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या एका कृतीने सर्वांनाच चकित केलं आहे. पाहूया नेमकं काय घडलं.

बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी यामध्ये नेहमीच सहकलारांमध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळते. एखाद्या सिनेमात एकत्र काम करत असताना अनेकवेळा या कलाकारांमध्ये छान बॉन्डिंग होतं. आणि हे बॉन्डिंग ते आयुष्यात नेहमीच जपताना दिसून येतात. असंच काहीसं अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांचंदेखील आहे. नुकतंच वैदेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आकाशला पाहून वैदेही मोठयाने किंचाळल्याचं पाहायला मिळालं होतं.

(हे वाचा: Tejaswini Lonari:...अन त्याने माझे केस कापले; तेजस्विनी लोणारीने सांगितला भावासोबतचा 'तो' किस्सा)

नुकतंच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा लोकप्रिय पुरस्कार सोहळा पार पडला. या रेड कार्पेटवर जवळजवळ सर्वच मराठी सेलेब्रेटींनी हजेरी लावली होती. अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामीसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे अभिनेत्री वैदेही रेड कार्पेटवर माध्यमांशी संवाद साधत होती. दरम्यान अचानक परश्या अर्थातच अभिनेता आकाश ठोसरने एन्ट्री घेतली.

" isDesktop="true" id="820781" >

आकाशला समोरुन येताना पाहून वैदेही परशुरामी अक्षरशः मोठ्याने किंचाळली. परंतु हे आनंदाने किंचाळणं होतं. अभिनेत्रीने सांगितलं की,मी खूप दिवसांनंतर आकाशला भेटतेय त्यामुळे त्याला अचानक समोर पाहून मला इतका आनंद झाला की मला स्वतःला कन्ट्रोल करता आलं नाही आणि मी मोठ्याने किंचाळले. वैदेही आणि आकाश म्हणाले आम्ही फोनवर सतत गप्पा मारत असतो परंतु प्रत्यक्षात भेटणं फारसं जमत नाही. वैदेहीने सांगितलं बरोबर एक वर्षामागे याच रेड कार्पेटवर आम्ही शेवटचं भेटलो होतो. त्यांनतर आज आमची भेट होतेय.

दरम्यान आकाश आणि वैदेहीने एकमेकांसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी मजेमजेत म्हटलं, कोणी दिग्दर्शक आम्हाला पाहात असेल तर बघा आमची जोडी छान दिसते. त्यामुळे तुम्ही आमच्याबाबत विचार करु शकता. तसेच वैदेही आणि आकाशने म्हटलं जॉनर कोणताही असो फक्त एकत्र काम करायला मिळणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. वैदेही आणि आकाशने 'एफयू' या चित्रपटात एकत्र काम केलं होत. आकाशचा हा सैराटनंतरचा दुसरा सिनेमा होता.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment