मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Vaibhavi Upadhyay: वैभवीच्या डोक्याला लागलेला जबर मार, कारची काच फोडून बाहेर निघण्याचा करत होती प्रयत्न, घटनेचं भयानक वास्तव

Vaibhavi Upadhyay: वैभवीच्या डोक्याला लागलेला जबर मार, कारची काच फोडून बाहेर निघण्याचा करत होती प्रयत्न, घटनेचं भयानक वास्तव

साराभाई व्हर्सेस साराभाई फेम वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन

साराभाई व्हर्सेस साराभाई फेम वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन

Vaibhavi Upadhyay Death: टीव्ही मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई 2' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,27  मे- टीव्ही मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई 2' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन झालं आहे. वैभवी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जात होती. दरम्यान, त्यांच्या फॉर्च्युनर कारला अपघात झाला आणि ती 50 फूट खोल दरीत कोसळली.यावेळी अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडसुद्धा तिच्यासोबत होता. सुदैवाने तो यामध्ये बचावला आहे. दरम्यान आता हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैभवी उपाध्याय सोमवारी हिमाचलला गेली होती. येथे ती तिच्या फॉर्च्युनर कारमधून कुल्लू शहरातील तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जात होती. यादरम्यान कारचा समतोल बिघडल्याने कार 50 फूट खड्ड्यात पडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली होती. मात्र वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवीसोबत कारमध्ये तिचा बॉयफ्रेंडसुद्धा उपस्थित होता. गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

(हे वाचा:Vaibhavi Upadhyay: धक्कादायक!तीन दिवसांत तिसरी घटना; 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू )

कुल्लूच्या एसपी साक्षी वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर अभिनेत्री वैभवी उपाध्याय कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. ती कारचा दरवाजा ठोठावून काच फोडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अभिनेत्रीला उपचारासाठी बंजारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु याठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आलं होतं. सोबतच अभिनेत्रीने सीट बेल्ट लावला नव्हता असं सांगितलं जात आहे.

वैभवी उपाध्यायला 'साराभाई व्हर्सेस साराभाई 2' मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या विनोदी मालिकेत तिने रोशेस अर्थातच अभिनेता राजेश कुमारची गर्लफ्रेंड जस्मिनची भूमिका साकारली होती. मालिकेत तिची ऑनस्क्रीन होणारी सासू रत्ना शहासोबतची तिची हटके केमिस्ट्री लोकांना पसंत पडत होती.

वैभवी उपाध्यायने टीव्ही शो 'साराभाई व्हर्सेस साराभाई 2',शिवाय 'क्या कसूर है अमला का', वेब सीरिज 'प्लीज फाइंड अटॅच्ड' आणि 'छपाक' चित्रपटातही काम केलं आहे. वैभवी उपाध्याय हे गुजराती इंडस्ट्रीतीलसुद्धा एक मोठं नाव होतं. अभिनेत्रीच्या अशा आकस्मिक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Life18, News18 Lokmat, Tv actress