नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : बॉलिवूडमधील (Bollywood) काही अभिनेत्रींनी आपल्या आश्वासक अभिनयातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाणी कपूर (Vaani Kapoor) हे त्यातलंच एक नाव. वाणीच्या नावावर अजून फारसे चित्रपट नसले तरी तिचा दमदार अभिनय हीच तिची ओळख ठरू पाहत आहेत. `शुध्द देसी रोमान्स` या पहिल्याच चित्रपटात दमदार अभिनय करत वाणीने आपल्या अभिनयाची दखल समीक्षकांनाही घ्यायला लावली होती. सुंदरतेसोबत अभिनयाची चांगली जाण असलेली वाणी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या फॅन्सशी कनेक्ट असते.
बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) वाणी कपूर सध्या नुकत्याच रिलीज झालेल्या `बेल बॉटम` (Bell Bottom) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत आहे. यशराज फिल्मस (Yash raj Films) सारख्या मोठ्या बॅनरच्या माध्यमातून वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच चित्रपटातील दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा जन्म 23 ऑगस्ट 1992 मध्ये दिल्लीत (Delhi) झाला. वाणीचे वडील शिव कपूर हे एक उद्योगपती आहेत. तिच्या आईचं नाव डिम्पी कपूर असून त्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत.
खरंतर वाणी कपूरचा चित्रपटसृष्टीशी तसा कोणताही संबंध नव्हता. मात्र तरी देखील तिचा `शुध्द देसी रोमान्स` हा पहिला चित्रपट विशेष चर्चिला गेला. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता.
वाणी कपूरने आपलं शिक्षण दिल्लीतील अशोक विहार येथील माता जय कौर पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर तिने इग्नू मधून टुरिझम या विषयात पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशीप पूर्ण केली. त्यानंतर ती आयटीसी हॉटेल्समध्ये काम करत होती.
वाणी कपूरने अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरवात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून केली. वाणीने राजुबेन या टेलिव्हिजन शोमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तिने यशराज फिल्मस सोबत 3 चित्रपटांसाठी करार केला.
`शुध्द देसी रोमान्स` या यशराज फिल्मसच्या चित्रपटातील भूमिकेसाठी तिची निवड ऑडिशनच्या माध्यमातून करण्यात आली. वाणी कपूरला `शुध्द देसी रोमांस` या चित्रपटासाठी फिल्मफेअरमधील `बेस्ट डेब्यू इन फिमेल कॅटेगरी` अॅवार्ड देऊन गौरवण्यात आलं होतं. यानंतर वाणी कपूरने `बँड बाजा बारात` या हिंदी चित्रपटाचा रिमेक असलेल्या आहा कलण्याम या तमिळ चित्रपटातही भूमिका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress