Home /News /entertainment /

बप्पी लहरी आनंद शिंदेना म्हणायचे, 'तू मराठीचा....' ; उत्कर्ष शिंदेने सांगितली 'ती' आठवण

बप्पी लहरी आनंद शिंदेना म्हणायचे, 'तू मराठीचा....' ; उत्कर्ष शिंदेने सांगितली 'ती' आठवण

Bappi Lahiri: ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri Death) ) यांचं आज आकस्मिक निधन झालं.यानंतर बप्पी लहरी यांच्या खास आठवणी अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर शेअर करत आहेत.

  मुंबई, 16 फेब्रुवारी- ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri Death) ) यांचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह संपूर्ण देशाला एक मोठा धक्का बसला आहे. यानंतर बप्पी लहरी यांच्या खास आठवणी अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर शेअर करत आहेत. अशीच एक बप्पी लहरी यांच्याविषची खास आठवण प्रसिध्द मराठी गायक आनंद शिंदे (Anand Shinde ) यांचा मुलगा व बिग बॉस मराठी 3 फेम डॉ. उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) शेअर केली आहे. उत्कर्ष शिंदेने इन्सटारवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये मिलिंद शिंदे, बप्पी लहरी, आनंद शिंदे तसेच जेष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर देखील दिसत आहेत. उत्कर्ष शिंदेने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आनंद शिंदे तुम मराठी का मायकल जेक्सन है " :- लेजेंड संगीतकार बप्पी लहरी..
  नवीन पोपटचा सुपरहिट काळ सुरु झाला होता जिकडे तिकडे त्याच गाण्याची चर्चा .कैक अवार्ड्स पटकावणारे नवीन पोपट हे आगळा वेगळा गीत ज्यासाठी पपांना (आनंद शिंदेंना )पहिले "प्लॅटिनम डिस्क "अवार्ड देऊन संगीतकार बप्पी लहरी दा ह्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ."आनंद शिंदे तुम मराठी का मायकल जेक्सन है " तुम्हारा ये नवीन पोपट मुझको बोहोत पसंद आया ये गाना मे हिंदी मे बनायेंगे म्हणत पाहिलं मराठी गीत हिंदीत रिमेक करण्यात आला .जगभरात मराठी गीताचा डंका वाजला होता कारण आनंद शिंदे चा लोकगीतातला नवीन पोपट अफाट गाजला होता ..नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला " हे आपल मराठी लोकगीत ज्याने हिंदी बॉलिवूडला ही भुरळ घातली होती आणि हे गाणं हिंदीत करावा ह्याचा अट्टहास संगीतकार बप्पी लहरी ह्यांनी निर्मात्यांनी कडे धरला ."पाप की दुनिया "चित्रपटात संगीतकार बप्पी लहरीदा ह्यांनी महागायक किशोरदा यांना घेऊन "नवीन पोपट हा " गाणं" "मे तेरा तोता तू मेरी मैना "अशा स्वरूपात हिंदीत रिमेक केलं . आनंद शिंदे तुम्हारा व्हॉईस पहाड है डिफरेन्ट है म्हणणारे गुरुतुल्य महा गायक संगीतकार बप्पी दा आपल्याला सोडून गेले ही बातमी ऐकून वाईट तर वाटलेच.पण तो दिवस ही आठवला ⓣ ⓢⓔⓡⓘⓔⓢ च्या गोल्डन चेरियेट रेकॉर्डिंग स्टुडिओत पप्पांनी मला बप्पी लहरी ह्यांची भेट करून दिली होती ..बप्पी दा तेव्हा पप्पांना भेटल्या भेटल्या "मायकल जेक्सन कैसा है तुम "म्हणत मिठी मारली तो क्षण आज ही जश्याचा तास मला आठवतो .मोठी माणसे का मोठी असतात कारण त्यांचे पाय जमिनीवर असतात ह्याच उदाहरण म्हणजे संगीतकार बप्पी दा .#बापसंगीतकार #rip#याद_आऱहा_हे_तेरा_प्यार. वाचा-काजोल ते अलका याज्ञिक Bappi Lahiri यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले कलाकार या पोस्टमधून उत्कर्षने त्याची व वडील शिंदे यांची बप्पी लहरी यांच्याविषयी आठवण शेअर केली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या