मुंबई, 24 मार्च : मागील काही दिवसांपासून एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'वेडात मराठे वीर दौडले सात'. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. मराठी सिने सृष्टीतील काही नावाजलेले कालाकार आणि काही नव्या कलाकरांची वर्णी सिनेमात लागली आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाचं शुटींग सुरू झालं आहे. कोल्हापूरात शुटींगसाठी सगळे कलाकार आणि सिनेमाची टीम दाखल झाली आहे. दररोज भर उन्हात सिनेमाचं शुटींग सुरू आहे. शुटींग दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट कलाकार शेअर करत असतात. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. कारमध्ये शुट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांच्या अजरामर पराक्रम पाहायला मिळणार आहे. सिनेमासाठी सगळ्या कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. अभिनयाबरोबर शारिरीक कष्ट देखील करावे लागले आहेत. शुटींगसाठी संपूर्ण टीम सध्या कोल्हापूरात आहे. सिनेमात घोडेस्वारी, स्टन्ड, लढाई सारखे अनेक धाडसी सीन्स पाहायला मिळणार आहेत. या शुटींगमध्ये कलाकारांची मात्र चांगलीच हालत होताना दिसत आहे. पण पॅकअफ झाल्यानंतर मात्र कलाकार काय धम्माल करतायत याचा व्हिडीओ समोर आला आहे.
उत्कर्ष शिंदेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता आरोह वेलणकर, हार्दीक जोशी आणि विराट मडके दिसत आहेत. गाडीत रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमातील 'वेड लावलंय' हे गाणं वाजत आहे. या गाण्यावर सगळे कलाकार धम्माल करताना दिसत आहेत. उत्कर्षनं शुटींग दरम्यान काय परिस्थिती आहे हे देखील पोस्टमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
उत्कर्षनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय, "आजच्या शूटच झालं पॅकअप आणि माझ्या वेड्या मित्रानं सोबत 'वेडलावलय -लावलय' म्हणत आखा कोल्हापूरचा रस्ताभर गात प्रवास करत आम्ही हॉटेल गाठलं. दिवसभर घोडे स्वारी ,स्टंट्स आणि प्रखर उन्हात वेड लावणारी एनर्जी तशीच ठेवत. रोज ही मस्ती सुरूच ठेवणार. हा आमचा वेड लावणारा परफॉर्मन्स नक्की बघा . व्हिडिओतील चार ठार वेडे"
सिनेमात अभिनेता हार्दीक जोशी, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे,प्रविण तरडे, विराट मडके, जय दुधाणे हे कलाकार आहेत. तर सत्या मांजरेकरच्या जागी अभिनेता सिद्धार्थ जाधवची वर्णी लागली आहे. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.