मुंबई, 20 मार्च : मराठी सिनेसृष्टीत सध्या एकामागून एक ऐतिहासिक सिनेमे येऊ घातले आहेत. 'पावनखिंड', 'हर हर महादेव'नंतर आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमाचं शुटींग नुकतंच सुरू झालं असून कलाकार मंडळी शुटींगसाठी कोल्हापूरात दाखल झाली आहे. कोल्हापूरात शुटींगला सुरूवात झाली असून कलाकार शुटींग दरम्यान धम्माल करताना दिसत आहेत. शुटींगला सुरूवात करण्याआधी दिग्दर्शक महेश मांजरेकर सगळ्या कलाकारांना घेऊन एका ठिकाणी गेले. ते ठिकाणही सर्वांसाठी तितकंच खास होतं. अभिनेता गायक उत्कर्ष शिंदेनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात कलाकारांची धम्माल पाहायला मिळत आहे.
स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांच्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात हा मराठीतील बिग बजेट सिनेमा आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमा चर्चेत आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. दरम्यान यावरून वाद ही निर्माण झाला होता. अक्षय कुमारला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. मात्र सिनेमाचं शुटींगही आता सुरू झालं आहे.सिनेमात अभिनेता हार्दीक जोशी, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे,प्रविण तरडे, विराट मडके, जय दुधाणे हे कलाकार आहेत. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील सिनेमात होता पण त्याला सिनेमातून काढल्याच्या चर्चा आहेत. सिनेमात त्याच्या जागी अभिनेता सिद्धार्थ जाधव असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा - बोला यळकोट यळकोट....'नवे लक्ष्य' फेम अभिजित श्वेतचंद्र बायकोसोबत पोहचला खंडोबाच्या दर्शनाला
View this post on Instagram
दरम्यान वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाचं शुटींग करत असताना दिग्दर्शक महेश मांजरेकर सगळ्या टीमला घेऊन दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला गेले. दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून पंगतीत जेवण केलं. अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनं कोल्हापूरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचप्रमाणे उत्कर्षनं पोस्ट देखील लिहिली आहे. त्यानं म्हटलंय, "दिग्दर्शनात एक नट म्हणून महेश मांजरेकर यांच्याकडून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्या सारखं नाहीये .एक वेगळाच अनुभव सर्व गुणी कलाकारानं सोबत वेळ घालवता येतोय ,प्रवीण तरडे दादा ,सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र" .
उत्कर्षनं पुढे लिहिलंय, "या सर्वांसोबत जोतिबा देवस्थान गेलो असता यांच्या सोबत जमिनिवर पंगतीती बसून जेवता आलं .थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेता आला. खरं तर इतक्या गप्पा गोष्टी अनुभव घडत आहेत की माझ्या येणाऱ्या आयुष्याला समृद्ध करतील असे क्षण व्यतीत करतोय सध्या .एक कलाकार म्हणून एक व्यक्ती एक माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे सर्वांकडून. तुम्हा सर्व रसिक माय बापाच्या आशीर्वादा मुळे हे शक्य होत आहे".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news