S M L

ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रईस खान यांचं निधन

ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रईस खान यांचं आज लाहोर इथं वृद्धापकाळानं निधन झालं.ते 77 वर्षांचे होते.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2017 07:21 PM IST

ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रईस खान यांचं निधन

07 मे : ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रईस खान यांचं आज लाहोर इथं वृद्धापकाळानं निधन झालं.ते 77 वर्षांचे होते.संगताच्या क्षेत्रात सितारचे जादूगार अशी त्यांची ओळख होती.

मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं 1939मध्ये त्यांचा जन्म झाला होता.1968 मध्ये ते पाकिस्तानात स्थायिक झाले. संगीतातल्या मेवाती घराण्याशी ते संबंधित होते. वयाच्या 5 व्या वर्षी त्यांनी मुंबईत पहिला कार्यक्रम केला.पंडित रविशंकर यांच्यासह जगभरातल्या आघाडीच्या अनेक संगीतकारांसोबत त्यांनी अनेक मैफली गाजवल्या आणि आपला चाहता वर्ग निर्माण केला होता.

सईस खान यांच्या निधनामुळे आपल्याला दु:ख झाल्याची प्रतिक्रिया लता मंगेशकर यांनी ट्विटरवर व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 07:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close