अभिनेत्री उषा नाईक येतायत फुटबाॅल खेळायला!

अभिनेत्री उषा नाईक येतायत फुटबाॅल खेळायला!

तुम्हाला एक हजाराची नोट सिनेमा आठवतो का? त्यातली अभिनेत्री उषा नाईक यांनी साकारलेली व्यक्तिरेखा अगदी अजरामर झाली. आता उषा नाईक वेगळ्या रूपात समोर येणार आहेत

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : तुम्हाला एक हजाराची नोट सिनेमा आठवतो का? त्यातली अभिनेत्री उषा नाईक यांनी साकारलेली व्यक्तिरेखा अगदी अजरामर झाली. आता उषा नाईक वेगळ्या रूपात समोर येणार आहेत. मिलिंद उके दिग्दर्शित मान्सून फुटबाॅल असं सिनेमाचं नाव आहे. आणि त्यात उषा नाईक चक्क फुटबाॅल खेळणार आहेत. मान्सून फुटबॉल या चित्रपटाची कथा काही गृहिणींच्या आयुष्याभोवती फिरते. या गृहिणी समाजात आपले एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी उषा नाईक सांगतात, मी आता गेली कित्येक वर्षं काम करतेय. माझी सुरुवात ग्रुप डान्सर म्हणून झाली आणि मी आजवर शंभर पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामे केली. आजवर मी जे कमावलं आहे, त्याचा मला अभिमान वाटतो.

हेही वाचा

आर्चीचा 'कागर'मधला हा व्हिडिओ पाहिलात का?

आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन

सोनम कपूरच्या 'या' फोटोंनी सोशल मीडियावर केलाय हंगामा!

या सिनेमात उषाताई फुटबाॅल खेळणार आहेत. त्यांच्या बरोबर सागरिका घाटगे, चित्राशी रावत, विद्या मालावडे, प्रीतम कांगणे, डेलनाझ इराणी आणि कविता अमरजीत या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 06:12 PM IST

ताज्या बातम्या