मराठी 'बिग बाॅस'मध्ये उषा नाडकर्णी!

आपल्या वयाचा एकही स्पर्धक या घरात नसल्याने दडपण वाढलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे इतर स्पर्धक कोण याची उत्सुकता वाढलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2018 04:54 PM IST

मराठी 'बिग बाॅस'मध्ये उषा नाडकर्णी!

03 एप्रिल : हिंदीतील 'बिग बॉस' हा बहुचर्चित रिअॅलिटी शो चांगलाच यशस्वी ठरला. आता 'बिग बॉस' मराठीत देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. आता मराठी 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणाऱ्या एका सेलिब्रिटीच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालंय.

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी मराठी 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणारेत. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट मान्य केलीय. या कार्यक्रमात येण्याआधी मला बऱ्याच गोष्टींची चिंता आहे. आपल्या वयाचा एकही स्पर्धक या घरात नसल्याने दडपण वाढलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे इतर स्पर्धक कोण याची उत्सुकता वाढलीय.

बिग बाॅसमधल्या एकेक स्पर्धकाचं नाव आता समोर येणार, असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...