Home /News /entertainment /

‘सुशांत प्रकरणाचा तपास का थांबला?’ उशा नाडकर्णी यांचा पोलिसांना सवाल

‘सुशांत प्रकरणाचा तपास का थांबला?’ उशा नाडकर्णी यांचा पोलिसांना सवाल

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करुच शकत नाही, कारण...; उशा नाडकर्णी पोलिसांच्या चौकशी प्रक्रियेवर संतापल्या

    मुंबई 13 जून: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता वर्ष उलटून गेलं आहे. (Sushant Singh Rajput death case) मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर मराठी अभिनेत्री उशा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी भाष्य केलं. “सुशांत हा महत्वाकांक्षी मुलगा होता तो आत्महत्या करुच शकत नाही. नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी घडलंय असं म्हणत त्यांनी आरोपीला अद्याप का पकडलं नाही? असा सवाल केला आहे. उशा आणि सुशांत यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत त्यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. या कार्यदरम्यान दोघांमध्ये जणू खऱ्याखुऱ्या आई-मुलाचं नातं निर्माण झालं होतं. सुशांत त्यांना खऱ्या आयुष्यात देखील आई म्हणूनच हाक मारायचा. परिणामी सुशांतच्या मृत्यूमुळं उशा यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत आपलं दु:ख देखील व्यक्त केलं. दिशा पटानीचं पहिलं ऑडिशन पाहिलं का? 10 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल ‘काळ्या चेहऱ्यामुळं मिळत नव्हतं काम’; फॅमेली मॅनच्या पत्नीनं केलाय वर्णद्वेषाचा सामना त्या म्हणाल्या, “सुशांतच्या जाण्याची बातमी मला माझ्या मेकअप आर्टिस्टकडून समजली. मी तिला म्हटलं नाही गं तो आपला सुशांत नसेल. तर ती म्हणाली नाही आपलाच सुशांत आहे. खूप वाईट वाटलं त्या मुलाच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. त्याने बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्याला चित्रपटही चांगले ऑफर होत होते. त्याने मला म्हटलं होतं की, आई मी बीकेसीला दोन कोटींचा फ्लॅट घेणार आहे. त्याला दिग्दर्शन शिकायला परदेशी जायचं होतं. मला त्याचा प्रचंड अभिमान होता.” यापुढे सुशांतच्या मृत्यूबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “तो अत्यंत महत्वकांक्षी मुलगा होता. तो अचानक आत्महत्या कसा करेल? मला हे पटलंच नाही की त्याने आत्महत्या केली. काहीतरी वेगळंच झालंय जे सगळ्यांपासून लपवून ठेवलं गेलंय. त्याला बॉलिवूडमधील काही लोक त्रास देत होते असं मला कळलंय. त्याच्या मृत्यूमागचं कारण अजूनही पोलीस का शोधू शकलेले नाहीत? पोलीस मोठमोठे गुन्हेगार पकडतात मग या प्रकरणात इतका वेळ का लागतोय? मी सुशांतला जवळून पाहिलंय. तो आत्महत्या करणारा मुलगा नक्कीच नव्हता.” सुशांत बद्दल अनुभव सांगताना उशा नाडकर्णी अत्यंत भावूक झाल्या होत्या.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case

    पुढील बातम्या