मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Lata Mangeshkar Award : उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

Lata Mangeshkar Award : उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अवॉर्ड

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अवॉर्ड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 28 सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्फे दरवर्षी गायन वादन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. कोरोना काळात हा पुरस्कार घोषित झाला मात्र त्याचं वितरण करण्यात आलं नव्हतं. यंदा 2020 आणि 2021चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  2020चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर 2021चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं. हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी लता दीदींचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. आज लता दीदींची जयंती या वेळी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा - Lata Mangeshkar Birth Anniversary: संगीताला दैवत मानणाऱ्या लता दीदी गायनाआधी करायच्या 'हे' काम; वाचून बसणार नाही विश्वास

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर म्हणजेच लता दीदींच्या धाटक्या बहिण. लता दीदीं आणि वडिलांच्या शिकवणीत त्या मोठ्या झाल्या.  सात ते आठ दशकनं त्यानं भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान देत आपलं अढळ स्थान निर्माण केलं.  मराठीप्रमाणे हिंदी, गुजराती, आसामी, तमिळ, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली.

तर बासरी वादक पं. हरीप्रसाद चौरसिया यांना 2020-21 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ( मरणोत्तर) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसंच त्यांना 5 लाख रुपये आणि स्मृर्तीचिन्हासह गौरवण्यात आलं. पं. हरीप्रसाद चौरसिया यांनी रागदारी संगीताबरोबर चित्रपट संगीत, भक्तीसंगीत, भावगीत अशा अनेक संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी केल आहे. सिलसिला, चहाँ आरा सारख्या उत्तम सिनेमांना त्यांनी संगीत दिलं आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news