• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • US election 2020: सनी लिओनीलाही निकालाची प्रतीक्षा; पोस्ट शेअर करत म्हणाली...

US election 2020: सनी लिओनीलाही निकालाची प्रतीक्षा; पोस्ट शेअर करत म्हणाली...

संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेतील निवडणुकी(US election)च्या निकालाकडे लागून राहिलं आहे. सनी लिओनी (Sunny Leone)ने देखील याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 04 नोव्हेंबर: अमेरिकेच्या निवडणूक (US President Election 2020)  निकालावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. ट्रम्प पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार की जो बायडन (joe biden) पुढचे अध्यक्ष होणार याबाबत लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि जो बायडन यांच्यात काँटे की टक्कर आहे. अमेरिकेच्या निकालाबद्दल अभिनेत्री सनी लिओनीनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या निकालाबद्दल सनी लिओनीची पोस्ट अमेरिका निवडणुकीच्या निकालाबद्दल सनीची उत्सुकता आता वाढली आहे. कधी जो बायडन आघाडी घेत आहेत तर कधी डोनाल्ड ट्रम्प त्यांना मागे टाकत आहेत. सनी या सगळ्या अपडेट्सवर लक्ष ठेऊन आहे. यानिमित्ताने सनीने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत दिसत आहे. दोघांनीही मतदानही केलं आहे. आणि ती इतरांनाही मतदान केलं का असा प्रश्न विचारत आहे. या पोस्टमध्ये तिने एक कॅप्शनही दिलं आहे. त्यामध्ये ती लिहिते, "हा सस्पेंन्स मला मारुन टाकेल." चक्क सनी लिओनीला राजकारणमध्ये एवढा रस आहे हे बघून तिच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  View this post on Instagram

  The suspense is killing me!!! @dirrty99

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

  दरम्यान निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर, निवडणुकीची (US President Election 2020) मतमोजणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. जो बायडन (joe biden) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, मुळ भारतीय निवासी असलेल्या चार उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.अमेरिका काँग्रेसच्या खालच्या सदनातील प्रतिनिधी सभेच्या डेमोक्रेटिक पक्षाकडून चार उमेदवार निवडणूक लढवत होते. हे चारही उमेदवार भारतीय निवासी आहे. डॉ.एमी बेरा (Dr. Ami Bera), प्रमिला जयपाल (Pramila Jayapal), रो खन्ना (Ro Khanna) आणि राजा कृष्णमूर्ती (Raja Krishnamoorthi) अशी चौघांची नावं आहे. या चौघांनीही जो बायडन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवली आणि जिंकली आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: