मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! उर्वशी रौतेलाने परिधान केला इतका महागडा ड्रेस! त्या किंमतीत खरेदी कराल कार

OMG! उर्वशी रौतेलाने परिधान केला इतका महागडा ड्रेस! त्या किंमतीत खरेदी कराल कार

  हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021   (Miss Universe 2021 Harnaaz Sandhu)  चा 'किताब जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक क्षणात अभिनेत्री उर्वशी रौतेला   (Urvashi Rautela)  परीक्षक म्हणून तेथे उपस्थित होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 डिसेंबर-  हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021   (Miss Universe 2021 Harnaaz Sandhu)  चा 'किताब जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक क्षणात अभिनेत्री उर्वशी रौतेला   (Urvashi Rautela)  परीक्षक म्हणून तेथे उपस्थित होती. तेथे उपस्थित परीक्षकांमध्ये उर्वशी सर्वात तरुण (कमी वयाची) परीक्षक होती.हरनाज संधू मिस युनिव्हर्स 2021 ठरल्यानंतर ती खूप आनंदी आणि भावुक झाली. भारताने २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे.मिस युनिव्हर्स स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. भारताला मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकताना पाहण्यात उर्वशी रौतेलासाठी अभिमानास्पद होतं. मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेत भारताच्या विजयानंतर उर्वशी रौतेला मायदेशी परतली आहे.

उर्वशी रौतेला एअरपोर्टवर स्पॉट झाली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. एयरपोर्टवर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. ती खूप खुश दिसत होती. यादरम्यान तिने पापाराझींना फोटोसाठी पोजही दिल्या. उर्वशीनेही सुंदर ड्रेस परिधान केला होता.

उर्वशी रौतेला बेबी पिंक मिनीस्कर्ट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती. उर्वशीचा हा ड्रेस पोसिओ आणि स्कारलेटने डिझाइन केला आहे. त्याची किंमत तब्बल 5 लाख रुपये आहे. ड्रेसमध्ये हिरे जडले होते. कोल्ड शोल्डर क्रॉप टॉप आणि बेबी पिंक हाय स्टिलेटोस ड्रेसमध्ये उर्वशी तिचा आकर्षक लुक दाखवत होती. यावेळी तिनं डायमंड इयरिंग आणि ब्रेसलेटही घातला होता.

वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, उर्वशी रौतेला एका मोठ्या बजेटच्या सायन्स फिक्शन तमिळ चित्रपटाद्वारे तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. यानंतर ती थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. उर्वशी रौतेलाने अलीकडेच 'ब्लॅक रोज'सोबत 'थिरुतू पायल 2' च्या हिंदी रिमेकचे नाव जाहीर केले आहे.याशिवाय उर्वशी रौतेला रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरीजमध्ये काम करत आहे. जो सुपर कॉप अविनाश मिश्रा यांच्या सत्यकथेवर आधारित बायोपिक आहे.

First published:

Tags: Entertainment, Urvashi rautela