Urvashi Rautela 55 लाखांचा लेहंगा घालून करीत होती Photoshoot; तोल गेला आणि...Video झाला व्हायरल

उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपला अनोखा अंदाज आणि कामामुळे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. तिचा फोटो असो वा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. नुकताच उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये उर्वशी प्रसिद्ध गायक जस मानससोबत फोटोशूट करीत असताना दिसत आहे. उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ नेहा कक्कडच्या लग्नाशी संबंधित आहे. ज्यात तिने 55 लाख रुपयांचा लेहंगा घातला आहे. मात्र दरम्यान उर्वशी रौतेलाचा बॅलेंस जातो आणि...त्यानंतर अभिनेत्री स्वत:ला सावरते. उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्वशी रौतेला प्रसिद्ध गायक मानकसोबत फोटोशूट करीत आहे. मात्र यादरम्यान उर्वशीचा तोल गेला. त्यानंतर ती स्वत:ला सावरते. आणि मानकसोबत फोटोशूट करू लागते. व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेला खूप सुंदर दिसत आहे. तर मान यांचा अंदाजही लोकांना आवडला आहे. उर्वशी रौतेलाच्या या व्हिडीओला 49 हजार लाइक्स मिळाले आहेत.
  हे ही वाचा-सैफ-अर्जुनच्या गैरहजेरीत करीना-मलायकाची मजामस्ती; एका खास व्यक्तीसह केलं एन्जॉय उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिच्या करिअरबद्दल सांगायचं झाल्यास तिने सनी देओल (Sunny Deol) सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिची पहिला चित्रपट  'सिंह साहेब द ग्रेट' होता, ज्यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकरली होती. यानंतर ती 'ग्रेट ग्रँड मस्ती' या चित्रपटात पाहायला मिळाली.
  उर्वशी 'हेट स्टोरी 4' मुळे खूप चर्चेत आली. वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास लॉकडाऊनपूर्वी उर्वशी रौतेलाचं एक गाणं 'एक डायमंड दा हार लेदे यार' रिलीज झालं होतं. हे गाणं सोशल मीडियावर खूप गाजलं होतं. यापूर्वी उर्वशी 'पागलपंती' चित्रपटात पाहायला मिळाली होती.
  Published by:Meenal Gangurde
  First published: