मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकली असती Urvashi Rautela; युद्धाच्या घोषणेआधी सोडला देश

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकली असती Urvashi Rautela; युद्धाच्या घोषणेआधी सोडला देश

Urvashi Rautela

Urvashi Rautela

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचादेखील (Urvashi Rautela was in Ukraine) समावेश झाला असता जर ती वेळीच तिथून बाहेर पडली नसती तर. रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्याच्या काही दिवस अगोदर उर्वशी युक्रेनमध्ये होती.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: रशियानं युक्रेनवर आक्रमण (Russia Attack on Ukraine) केलं आहे. गुरुवार ते शुक्रवार दरम्यान रशियानं युक्रेनवर 203 हल्ले केल्याचं वृत्त आहे. रशियानं दावा केला आहे की, त्यांनी युक्रेनमधील 70हून अधिक महत्त्वाचे तळ नष्ट केले आहेत. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) जगभरात तणाव वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन यासारखी बलाढ्य राष्ट्रं आणि युरोपियन युनियननं (European Union) रशियावर आर्थिक निर्बंध (Economic Restrictions on Russia) लादले आहेत. अशा या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतातील जवळपास 18 हजार विद्यार्थी (Indian Students in Ukraine) आणि काही नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी तिथे अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांनी सरकारला मदतीसाठी आवाहन केलं. मदतीची मागणी करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचादेखील (Urvashi Rautela was in Ukraine) समावेश झाला असता जर ती वेळीच तिथून बाहेर पडली नसती तर. रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्याच्या काही दिवस अगोदर उर्वशी युक्रेनमध्ये होती. हे वाचा-Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू चिंतेत मीडिया अहवालानुसार, उर्वशी रौतेला दोन दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये तिच्या चित्रपटाचं शूटिंग करत होती. तिथे तिनं एक व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती युक्रेनच्या सौंदर्याचं (Beauty of Ukraine) कौतुक करताना दिसली होती. 'शूटच्या अगोदर मोकळी हवा श्वासांत भरते आहे. फोन आणि बातम्यांपासून डिस्कनेक्ट होण्यासारखं दुसरं समाधान नाही. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला महत्त्व आहे. आपणही निसर्गासारखं सर्वांवर सारखं प्रेम करण्यास शिकलं पाहिजे', असं कॅप्शन उर्वशीनं या व्हिडीओला दिलं होतं. आज (25 फेब्रुवारी) उर्वशीचा वाढदिवस (Urvashi Rautela Birthday) असून सेलिब्रेशनसाठी ती आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये गेली आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिला अनेक भेटवस्तू आणि शुभेच्छा पाठवल्या आहेत. उर्वशीनं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्वशी योग्यवेळी पॅकअप (Pack-up) करून युक्रेनमधून बाहेर पडली होती. नाहीतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये तिचा समावेश झाला असता. उर्वशी युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडल्याची बातमी समजल्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. हे वाचा-HBD: मनीष मल्होत्राच्या पार्टीत आमंत्रणाशिवाय पोहोचली होती उर्वशी रौतेला दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या काही भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आलं आहे. उर्वरित भारतीयांना आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, Urvashi rautela

पुढील बातम्या