‘हे काय घातलंय?...’; उर्वशी रौतेला विचित्र मास्कमुळं होतेय ट्रोल

‘हे काय घातलंय?...’; उर्वशी रौतेला विचित्र मास्कमुळं होतेय ट्रोल

सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिनं. तिनं चक्क हिऱ्यांचा फेस मास्क घातला आहे. (diamond mask)

  • Share this:

मुंबई 10 एप्रिल: कोरोना विषाणूचं (covid-19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. या वाढत्या संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ आणि प्रशासन मास्क वापरण्याचा सल्ला देत आहे. (Coronavirus masks) त्यामुळं सध्या अनेक सेलिब्रिटी महागडे मास्क वापरताना दिसत आहेत. कोणी नाईकी कंपनीचा मास्क वापरतोय तर कोणी लुईस विटॉनचा. मात्र यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिनं. तिनं चक्क हिऱ्यांचा फेस मास्क घातला आहे. (Diamond mask) मात्र या विचित्र मास्कमुळं तिला सध्या ट्रोल केलं जात आहे.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मादक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असेत. यावेळी तिनं हिऱ्यांचा फेस मास्क घालून एक व्हिडीओ शेअर केला. अर्थात हे हिरे खरे आहेत की खोटे याबाबत तिनं अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. परंतु हा मास्क पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिची खिल्ली उडवली आहे. हे नेमकं घातलंय तरी काय? याला नक्की मास्कच म्हणायचं का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया देऊन नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

अवश्य पाहा - संजीव कपूर यांना व्हायचं होतं डॉक्टर अन् झाले शेफ; त्या घटनेमुळं बदललं करिअर

तीन दिवसांत 17,414 रुग्ण; 57 जणांचा मृत्यू

राज्यात अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतरही करोना रुग्णवाढ आणि मृत्यूचे प्रमाण कायम आहे. मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांच्या टाळेबंदीच्या कालावधीत 17 हजार 414 करोना रुग्ण आढळले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधित आणि मृतांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

Published by: Mandar Gurav
First published: April 10, 2021, 11:47 AM IST

ताज्या बातम्या