उर्वशी रौतेलानं सोशल मीडियावर केला बॉयफ्रेंडबाबत खुलासा, आता व्हायरल होतोय PHOTO

उर्वशी रौतेलानं सोशल मीडियावर केला बॉयफ्रेंडबाबत खुलासा, आता व्हायरल होतोय PHOTO

उर्वशीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिच्या बॉयफ्रेंडबाबत खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या अनेक पोस्ट सुद्धा व्हायरल होताना दिसत असतात. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या तिच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ज्यात ती अभिनेता गौतम गुलाटीसोबत सप्तपदी घेताना दिसत होती. पण हा फोटो केवळ तिच्या वेब सीरिजच्या प्रमोशनचा भाग असल्याचं समोर आलं. पण आता एक नव्या कारणामुळे उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडबाबत खुलासा केला आहे.

उर्वशीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर कवळ आहे. तिचा हा फोटो खूप विरळ होत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा केला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिलं, ‘माझा बॉयफ्रेंड हा 30 फेब्रुवारी सारखा आहे. ज्याचं काहीच अस्तित्व नाही.’ याच कॅप्शनमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘व्हर्जिन भानुप्रिया 16 जुलैला रिलीज होणार आहे. या वेब सीरिजच्या ट्रेलरला खूप प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार.’

वाचा-हॉट अँड फिट! अभिनेत्रीच्या स्टाइलिश वर्कआऊटचे PHOTO पाहून तुम्हीही दिवाने व्हाल

वाचा-‘तेरी मासूम हँसी पे, मैं जी लेता हू’ सुशांतच्या स्माईलमागे होतं इतकं दु:ख की...

उर्वशी रौतेलाची मुख्य भूमिका असलेली वेब सीरिज ‘व्हर्जिन भानुप्रिया’ येत्या 16 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजमध्ये तिच्यासोबत बिग बॉस फेम अभिनेता गौतम गुलाटी सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत आहे. याशिवाय अर्चना पूरण सिंह, डेलनाझ इराणी, राजीव गुप्ता, बृजेंद्र काला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी गौतम गुलाटीने त्याच्या इन्स्टाग्रामवर उर्वशी सोबतचा या वेब सीरिजमधील एक फोटो शेअर केला होता. ज्याला त्यानं, ‘लग्नाच्या शुभेच्छा नाही देणार का?’ असं कॅप्शन दिलं होतं. ज्यामुळे त्यांचे चाहते सुद्धा खूप गोंधळले होते.

वाचा-सुशांतची Ex मॅनेजर दिशाचे कुटुंबीय आले समोर, या अफवेबाबत दिलं स्पष्टीकरण

Published by: Manoj Khandekar
First published: July 7, 2020, 10:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या