मुंबई, 29 मार्च : अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सध्या क्वारंटाईनच्या काळातही ती नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती समुद्राच्या पाण्यात अंघोळ करताना दिसली होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये धम्माल करताना दिसत आहे आणि तिचा हा व्हिडीओ तिनं दिलेल्या कॅप्शनमुळे खूप व्हायरल होत आहे.
उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. उर्वशीनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, अगोदर मला बाहेर जाण्याविषयी फारशी उत्सुक नसे. माझ्यासाठी ते एवढं महत्त्वाचं नव्हतं. पण आता... तुम्ही सध्या स्वतःला बीझी ठेवण्यासाठी काय काय करत आहात. उर्वशीच्या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट पाहायला मिळत आहेत.
Lockdown मध्ये एकमेकांना वेळ देत आहेत रणबीर-आलिया, VIDEO व्हायरल
सध्या इतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे उर्वशी सुद्धा घरी राहून या व्हायरसच्या लढाईमध्ये देशाची साथ देत आहे. दरम्यान ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत संवाद साधताना दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत की, ती सध्या घराबाहेर पडण्यास खूप उत्सुक आहे आणि विशेष म्हणजे ती सध्या बाहेरच्या जगाला खूप मिस करताना दिसत आहे.
‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान
काही दिवसांपूर्वीच उर्वशीचं 'एक डायमंड दा हार लेदे यार' हे गाणं रिलीज झालं आहे. जे सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याआधी उर्वशी पागलपंती सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत पुलकित सम्राट, अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज आणि कृती खरबंदा यांच्यासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...