मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) या दिवसात सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. अभिनेत्री सातत्याने सोशल मीडियावर (Social Media) आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यादरम्यान अभिनेत्रीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो जरा खास आहे. कारण अभिनेत्रीने हा व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर 3 कोटी फॉलोअर्स (Urvashi Rautela Instagram Followers) पूर्ण झाल्याच्या आनंदात शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांचे आभार मानत उर्वशी रौतेलाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यासोबत तिने खास नोटही लिहिली आहे.
अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की - इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले, त्याबद्दल आभार. तुम्हा सर्वांना माझं प्रेम..माझ्या गोष्टीतील सर्वात महत्त्वाचा भाग बनण्यासाठी तुमचे धन्यवाद..माझ्या आयुष्यात यायला आणि आनंद देण्यासाठी मी तुमची आभारी आहे. मला प्रेम द्यायला आणि प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी आभार..सुंदर आठवणींसाठी धन्यवाद...
इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबत उर्वशी रौतेला ही अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्याही पुढे गेली आहे. इंस्टाग्रामवर अमिताभ बच्चने याचं 2.21 कोटी फॉलोअर्स आहे, तर शाहरुख खान याचे 2.24 कोटी फॉलोअर्स आहे. अशात उर्वशी अत्यंत आनंदात आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर्स झाल्याच्या आनंदात एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आनंदात डान्स करताना दिसत आहे.