विराट कोहलीला टक्कर देतेय उर्वशी रौतेला, जिममधील हा VIDEO पाहून व्हाल हैराण

विराट कोहलीला टक्कर देतेय उर्वशी रौतेला, जिममधील हा VIDEO पाहून व्हाल हैराण

अभिनेत्री उर्वशी रौतेलानंही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याची तुलना आता विराटसोबत केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम सध्या न्यूझीलंडमध्ये दमदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या 4 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियानं धमाकेदार विजय मिळवला आहे. दरम्यान विराट कोहलीचा एक जिम व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची क्रेझ आता बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. विराट प्रमाणे आता अभिनेत्री उर्वशी रौतेलानंही एक व्हिडीओ बनवला आहे. ज्याची तुलना आता विराटसोबत केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

Putting in the work shouldn't be a choice, it should be a requirement to get better. #keeppushingyourself

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ उर्वशीनं तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओतून उर्वशीनं तिच्या चाहत्यांना फिटनेस टीप्स दिल्या आहेत. विराट आणि उर्वशी या दोघांच्याही व्हिडीओमध्ये ते दोघंही उंच उडी मारताना दिसत आहेत. पण या दोघांनी केलेला हा एक्सरसाइझ म्हणावा तेवढा सोप्पा नक्कीच नाही. यासाठी या दोघांनीही खूप मेहनत घेतली आहे. उर्वशीच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

VIDEO : प्रेम की दुरावा? सावत्र आई करिना कपूरसोबत कसं आहे साराचं नातं

उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच तिचं गाणं ‘एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणं रिलीज झालं. सोशल मीडियावर हे गाण खूपच पसंत केलं गेलं. याआधी उर्वशी पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ, कृति खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 2014 मध्ये आलेलं हनी सिंहचं गाणं लव्ह डोसमुळे उर्वशीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

VIDEO : मुंबईच्या ट्राफिकमध्ये सोनाक्षीची बुलेट राइड, युजर्स म्हणाले...

कॅलेंडवर चालतं 'या' अभिनेत्रीचं आयुष्य, वर्षातून फक्त 12 वेळाच होते पतीची भेट

First published: February 1, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या