Nach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण?

स्टार प्लसवरील ‘नच बलिए’ हा लोकप्रिय डान्स शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 03:32 PM IST

Nach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण?

मुंबई, 18 जून : स्टार प्लसवरील ‘नच बलिए’ हा लोकप्रिय डान्स शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला. या शोचा प्रोमो जेवढा मजेदार आहे तेवढीच त्याची थीम सुद्धा हटके आहे. यावेळी या शोमध्ये कपल्स नाही तर एक्स कपल्स एकत्र येत डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या शोच्या प्रोमोमध्ये ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकिया तिच्या पार्टनर सोबत हॉट डान्स करताना दिसत आहे. मात्र चेहऱ्यावरील मास्कमुळे तिच्या पार्टनरचा चेहरा मात्र दिसत नाहीये. त्यामुळे आता उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा तो कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


International Yoga Day योग करून या 5 अभिनेत्री ठेवतात स्वतःला फिट आणि सेक्सी

उर्वशीनं काही दिवसांपूर्वी मीडियवरून ती या शोमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता तिनं या शोचा टीझर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडोओ शेअर करताना तिनं लिहिलं, सरप्राइझ, नवा शो, नवी सुरुवात. सर्वांना प्रेम. या व्हिडिओमध्ये डान्स करताना उर्वशी म्हणते, 'नच के बहाने टच, नो-नो.' त्यावर तिचा पार्टनर म्हणतो, 'का?' त्यावर उर्वशी म्हणते, 'एक्स आहेस ना म्हणून.' यावरून या शोची थीम एक्स कपल असल्याचं लक्षात येतं.


Loading...

मराठी दणका! स्वप्नील जोशीच्या मॅजिकसमोर तापसी पन्नूही पडली फिकी


या वर्षी नच बलिए हा शो सलमान खान प्रोड्यूस करत आहे. सोबतच या शोमध्ये वेगवेगळे ट्विस्टही पाहायला मिळणार आहेत. या शोच्या प्रोमोमध्ये उर्वशी सोबत दिसलेला हा अनोळखी चेहरा दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचा एक्स बॉयफ्रेंड अनुज सचदेव असल्याचं बोललं जात आहे. पण अद्याप या वृत्ताला उर्वशी कडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सलमान खान स्वतः या पार्टनरची ओळख सांगत नाही तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावीच लागणार आहे. सध्या अनुज ‘एक भ्रम : सर्वगुण संपन्न’ मध्ये काम करत आहे.

VIDEO: Aamir Khan सोबत मुलगी इराने केलं असं काही की तो झोपू शकला नाही
 

View this post on Instagram
 

The road less taken! Love the trail life 🌲 #AJSDiaries #ApnAnuj #AnujTravels


A post shared by Anuj Sachdeva (@apnanuj) on
 

View this post on Instagram
 

Win in your mind and you will win in your reality. #SpotlightSunday


A post shared by Anuj Sachdeva (@apnanuj) on
 

View this post on Instagram
 

Making the most of the last few days in The States before I fly back home! ☺️ #ApnAnuj #TravelDiaries


A post shared by Anuj Sachdeva (@apnanuj) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...